Ashok Chavan News : नांदेडवर पकड मिळवण्यासाठी अशोक चव्हाण 'अ‍ॅक्टिव्ह'; विरोधकांच्या तंबूत शिरकाव!

Ashok Chavan active to regain control of Nanded-Congress-NCP-Uddhav Sena workers join BJP-Marathwada : काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीनही पक्षाला सुरूंग लावत त्यांनी शेकडो पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये आणण्याचा धडाका सुरू केला आहे.
Ashok Chavan Nanded News
Ashok Chavan Nanded NewsSarkarnama
Published on
Updated on

नांदेड : लोकसभा निवडणुकीआधी अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी भाजप मध्ये प्रवेश केल्यानंतर संपूर्ण नांदेड जिल्हा 'काँग्रेस मुक्त'होईल असा दावा केला जात होता. मात्र घडले उलटेच, माजी मुख्यमंत्री आणि नांदेड जिल्ह्याची नस माहित असलेला, अनुभवी नेता सोबतीला असून देखील लोकसभा निवडणुकीत भाजपचा पराभव झाला. अर्थात तो संपूर्ण महाराष्ट्रात झाला. पण नांदेडमधील पराभव अधिक धक्कादायक आणि अशोक चव्हाण यांच्या अस्तित्वावर प्रश्न निर्माण करणारा ठरला.

पण त्यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि अशोक चव्हाण यांनी जोरदार मुसंडी मारत सगळे आमदार निवडून आणले. या यशाचे श्रेय अशोक चव्हाण यांनाही जाते. भाजपमध्ये स्पर्धक असलेले अशोक चव्हाण यांचे कट्टर विरोधक माजी खासदार तथा विद्यमान आमदार प्रताप पाटील चिखलीकर हे आता राष्ट्रवादी काँग्रेससोबत असल्याने अशोक चव्हाण यांना नांदेडमध्ये (Nanded) आपली पकड पुन्हा मिळवण्याची संधी मिळाली आहे.

Ashok Chavan Nanded News
Ashok Chavan News : अशोक चव्हाणांचा नांदेडमध्ये काँग्रेसला धक्का! अनेक पदाधिकाऱ्यांची हाती 'कमळ'

आगामी महापालिका व जिल्हा परिषदेच्या निवडणुका पाहता अशोक चव्हाण 'अ‍ॅक्टिव्ह मोड'वर आले आहेत. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीनही पक्षाला सुरूंग लावत त्यांनी शेकडो पदाधिकाऱ्यांना भाजपमध्ये आणण्याचा धडाका सुरू केला आहे. याचा निश्चितच फायदा येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत भाजपला होऊ शकतो. भोकर मतदारसंघातून कन्या श्रीजया चव्हाण यांचा झालेला विजय चव्हाणांचा आत्मविश्वास वाढवणार ठरला आहे.

Ashok Chavan Nanded News
Ashok Chavan News : पंकजा मुंडे नांदेडच्या पालकमंत्री? चर्चा आहे! खासदार चव्हाण म्हणाले, तो फार मोठा विषय नाही…

नुकताच नांदेड जिल्ह्यातील काही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. अशोक चव्हाण यांनी या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे पक्षात स्वागत करत त्यांना उज्वल भविष्याचे स्वप्न दाखवले आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य मनोहर पाटील शिंदे आणि गंगाप्रसाद काकडे यांनी भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या समवेत नांदेड दक्षिण विधानसभा मतदारसंघातील आणि ग्रामीण भागातील अनेक सरपंच,माजी सरपंच, पदाधिकारी आणि प्रमुख कार्यकर्तेही भाजपमध्ये सामील झाले.

Ashok Chavan Nanded News
Maharashtra Congress President : नाना पटोलेंचे पायउतार होण्याचे संकेत? चव्हाण, थोरात, कदम, ठाकूर, देशमुख चर्चेत...

अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या पक्ष प्रवेश सोहळ्यात भाजप प्रदेश उपाध्यक्ष माजी आमदार अमरनाथ राजूरकर उपस्थित होते. माजी सरपंच साहेबराव सेलुकर (गोपाळ चावडी),गंगाधर पाटील शिंदे (धनेगाव), पुंडलिक मस्के (बाभुळगाव) तर विद्यमान सरपंच दत्ता पाटील जाधव (वांगी),माधव पाटील पुयड (पिंपळगाव मिश्री) यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

Ashok Chavan Nanded News
Ajit Pawar Vs BJP : भाजप अजितदादांच्या पोस्टरला काळं फासण्याच्या तयारीत, युतीमध्येही वादाची ठिणगी?

या शिवाय काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्याही अनेक पदाधिकाऱ्यांनी भाजपचे कमळ हाती घेतले. दरम्यान, अशो चव्हाण यांनी नांदेड-वाघाळा शहर महानगरपालिकेतील भारतीय जनता पक्षाच्या माजी नगरसेवकांची आज बैठक घेतली.यावेळी प्रामुख्याने शहरातील विकासकामे,सार्वजनिक प्रश्न,मनपाची आगामी निवडणूक आणि भाजप सदस्यता नोंदणी मोहिमेबाबत चर्चा केली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com