Hotel Politics Hatkanangale गावकारभारी कोण? हॉटेल पॉलिटिक्स सुरु; सत्ताधाऱ्यांचे सदस्य विरोधकांनी पळवले...

Kolhapur Politics Pattankadoli Sarpanch Election Opposition Strategies: उपसरपंच अमोल संभाजी बाणदार यांच्या प्रभारी सरपंचपदाची धुरा घेणार असे समजताच बरोबर सत्ताधाऱ्यातील सदस्यांना गळाला लावत विरोधकांनी मोट बांधत पळवा पळवी सुरू केली आहे.
Kolhapur Politics Pattankadoli Sarpanch Election
Kolhapur Politics Pattankadoli Sarpanch ElectionSarkarnama
Published on
Updated on

Kolhapur News 16 Jan : हातकणंगलेतील पट्टणकडोली सरपंच भाग्यश्री कोळी यांनी दिलेल्या मुदतीत जातप्रमाणपत्र सादर न केल्याने यांचे पद जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अपात्र घोषित केले. नवीन सरपंचपदी कोण? यावरुन कोल्हापूरचं राजकारण पेटलं आहे.

सरपंचपद हे अनुसूचित जाती- जमातीसाठी राखीव आहे. पण, प्रभारी सरपंचपदासाठी या अटीची गरज नसते. म्हणून गावचा प्रभारी सरपंच होण्यासाठी अनेक इच्छुक सदस्यांनी हालचाली गतिमान केल्या आहेत. मात्र उपसरपंच अमोल संभाजी बाणदार यांच्या प्रभारी सरपंचपदाची धुरा घेणार असे समजताच बरोबर सत्ताधाऱ्यातील सदस्यांना गळाला लावत विरोधकांनी मोट बांधत पळवा पळवी सुरू केली आहे.

Kolhapur Politics Pattankadoli Sarpanch Election
Baramati Krishi Exhibition : सुप्रियाताईंच्या हस्ते सत्कार स्वीकारताना अजितदादांच्या चेहऱ्यावर हास्य उमटलं! नेमकं काय घडलं?

सदस्यांना थेट घरातून घेऊन कोल्हापूर जिल्ह्याच्या दक्षिण भागात नेऊन एका हॉटेलमध्ये नजर कैदेत ठेवले आहे. त्यामुळे विद्यमान उपसरपंच अमोल संभाजी बाणदार यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचालीना वेग आला आहे. सरपंच भाग्यश्री कोळी यांनी दिलेल्या मुदतीत जातप्रमाणपत्र सादर न केल्याने यांचे पद जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी अपात्र घोषित केले.

त्या जागेवर प्रभारी म्हणून उपसरपंच अमोल बाणदार यांची नियुक्ती झाली आहे. त्यांच्या कामकाजावर सत्ताधारी आणि विरोधकातील त्यांची नाराजी आहे. त्यांच्यावर अविश्वास ठराव आणण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. मात्र विरोधकांकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने सत्ताधाऱ्यातील काही नाराज सदस्यांना गळाला लावले आहे. इतकेच नव्हे तर सत्ताधाऱ्यातील सदस्यांना थेट घरातून घेऊन एका निर्जनस्थळी सहलीसाठी नेले असल्याची माहिती आहे.

Kolhapur Politics Pattankadoli Sarpanch Election
Saif Ali Khan Attack : सैफवर जीवघेणा हल्ला; राऊतांचा PM मोदींसह फडणवीसांवर निशाणा, म्हणाले, "त्यामुळेच बीड ते मुंबईपर्यंत..."

यातील काही सदस्य सहलीवर गेल्याचे समजते. याबाबत येत्या दोन-तीन दिवसांत चित्र स्पष्ट होण्याची शक्यता आहे. उपसरपंच आणि प्रभारी सरपंच कोण होणार, याबद्दल गावात मोठ्या प्रमाणात उत्सुकता लागून राहिलेली आहे.

ग्रामपंचायतीच्या उपसरपंचांवर अविश्वास ठराव मांडण्यासाठी, ग्रामपंचायतीच्या एकूण सदस्यांपैकी किमान एक तृतीयांश सदस्यांनी अविश्वास प्रस्तावाची नोटीस द्यावी लागते. या नोटीससाठी मुंबई ग्रामपंचायत (सरपंच किंवा उपसरपंच) अविश्वास ठराव नियम 1975 च्या नमुन्याचा वापर केला जातो.

Kolhapur Politics Pattankadoli Sarpanch Election
Hindenburg Shut Down: गौतम अडाणींसह उद्योगविश्वाला अडचणीत आणणारी कंपनी बंद; संस्थापकांनी का घेतला हा निर्णय

१५ हजारांच्या आसपास गावाचे मतदान असल्याने लोकनियुक्त सरपंच आणि १७ सदस्य अशी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यांची संख्या आहे. यामध्ये सरपंचपद ठाकरेसेनेकडे होते. तर महाविकास आघाडी म्हणून १० सदस्य, ताराराणी पक्ष ४, अपक्ष ३ अशी सदस्य संख्या आहे. विद्यमान उपसरपंच अमोल बाणदार यांच्यावर अविश्वास ठराव आणून नवीन उपसरपंच निवडण्यासाठी मोठ्या प्रमाणात हालचालीने वेग घेतला.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com