National Security Advisor Ajit Doval shares fond memories of spending one-and-a-half years of his childhood in Pune during the Lokmanya Tilak Award ceremony. sarkarnama
पुणे

Ajit Doval : अजित डोवल यांचं पुणे कनेक्शन..., स्वतःच सांगितली 'ती' आठवण; म्हणाले, 'पहिली दीड वर्ष...'

Ajit Doval Lokmanya Tilak Award Ceremony : डोवाल म्हणाले की, आजही देशासमोर अंतर्गत आणि बाह्य आव्हाने आहेत. मात्र, देश एकत्र राहिला तर आपण भारताला निश्चितच शक्तिशाली बनवू शकतो.

Roshan More

Pune News : आज राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांना देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी त्यांनी त्यांच्या पुण्य संदर्भात असलेल्या आठवणींना उजाळा दिला

अजित डोवाल म्हणाले, स्वातंत्र्य म्हणजे आपल्याला वाटेल ते करणे नव्हे, तर राष्ट्रासाठी कठीण मार्ग स्वीकारून नेतृत्व करणे होय. ​आज टिळक असते तर "इंग्रजांच्या काळात टिळकांनी 'स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' असा नारा दिला होता. आज जर टिळक असते, तर त्यांनी 'भारताला सशक्त आणि विकसित बनवणे हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे' असे म्हटले असते."आजच्या तरुणांनी राष्ट्रनिर्माणासाठी विचार केला पाहिजे. ज्या गोष्टीमुळे देशाचे नुकसान होत असेल, त्या मार्गावर आपण जाता कामा नये.

देशाच्या सद्यस्थितीवर बोलताना डोवाल म्हणाले की, आजही देशासमोर अंतर्गत आणि बाह्य आव्हाने आहेत. मात्र, देश एकत्र राहिला तर आपण भारताला निश्चितच शक्तिशाली बनवू शकतो. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्या नेतृत्वाचा उल्लेख करत ते म्हणाले, "मी गृहमंत्री अमित शाह यांचे देशाप्रती असलेले प्रेम आणि समर्पण जवळून पाहिले आहे. त्यांनी देशासाठी केलेले काम भारताला नक्कीच पुढे घेऊन जाईल."

बालपणीच्या आठवणींना उजाळा

अजित डोवाल पुढे म्हणाले, पुण्याशी एक माझा छोटासा संबंध आहे. 76 वर्षापूर्वी मी या शहरांमध्ये आलो होतो जेव्हा माझे वडील आर्मी मध्ये या ठिकाणी कार्यरत होते. त्यामुळे मी माझ्या शाळेच्या सुरुवात पुण्यातून केली. दीड वर्ष इथे होतो. त्यानंतर पुन्हा माझ्या वडिलांची बदली दिल्लीमध्ये झाल्याने आम्हाला जावं लागलं

त्या दीड वर्षातील बहुतांश गोष्टी मी विसरलो आहे. मात्र एखाद दोन गोष्टी मला अजूनही आठवतात त्यातील एक गोष्ट म्हणजे प्रत्येक मंगळवारी चतुर्शिंगी मंदिरात माझ्या आईने मला घेऊन जाणं, देवीला एक मोठा भोग आमच्या माध्यमातून चढवला जायचा आणि त्याचाच प्रसाद आम्ही आनंदाने खात असायचो. माझ्या आईची खूप श्रद्धा होती.

शिक्षकांनी सांगितली टिळकांची गोष्ट

दुसरी गोष्ट मी ज्या शाळेमध्ये शिकत होतो त्या ठिकाणी एक प्रथा होती शाळेत प्रार्थना नंतर एक वरिष्ठ शिक्षक व्याख्यान देत. प्रत्येक शिक्षक वेगवेगळ्या महापुरुषांच्या गोष्टी सांगत असत त्यावेळी आमच्या एका हिंदीच्या शिक्षकांनी त्यावेळी टिळकांच्या जीवनावर त्यांनी व्याख्यान दिले होते. त्यावेळी लोकमान्य टिळक यांच्याबाबत मला पहिल्यांदा जाणून घ्यायला मिळालं. मला कधी वाटले नव्हते एवढ्या वर्षांनी मला त्यांच्याच नावाचा पुरस्कार दिला जाईल. असं डोवाल यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT