

नवी दिल्ली : आर्थिकदृष्ट्या दुर्बल महिलांना आर्थिक आधार देण्यासाठी दिल्ली सरकारने 'दिल्ली लक्ष्मी योजना' सुरू केली आहे. मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या योजनेच्या ऑनलाइन पोर्टलचे उद्घाटन केले असून, अर्ज प्रक्रियेलाही सुरुवात झाली आहे.
या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 2,500 रुपयांची आर्थिक मदत दिली जाणार आहे. पहिला हप्ता रक्षाबंधनाच्या निमित्ताने थेट लाभार्थींच्या बँक खात्यात जमा केला जाणार आहे. या योजनेचा लाभ सुमारे 17 लाख महिलांना मिळणार असून, महिलांचे आर्थिक सक्षमीकरण हा या योजनेचा मुख्य उद्देश असल्याचे मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी सांगितले.
या योजनेसाठी अर्ज करणारी महिला 21 ते 60 वर्षे वयोगटातील असावी. संबंधित महिला किंवा तिचे कुटुंब किमान 10 वर्षांपासून दिल्लीचे कायमस्वरूपी रहिवासी असणे आवश्यक आहे. कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असावे. एका कुटुंबातील फक्त एका महिलेलाच या योजनेचा लाभ मिळेल.
ज्या कुटुंबात तीनपेक्षा जास्त मुले आहेत, चारचाकी वाहन आहे, वर्षाला 2,400 युनिटपेक्षा जास्त वीज वापर होतो, कुटुंबातील कोणी GST भरत असेल किंवा सरकारी कर्मचारी असेल, अशा महिलांना या योजनेचा लाभ मिळणार नाही.
लाभार्थींना दरमहा 2,500 रुपये दोन पर्यायांद्वारे दिले जातील. पहिल्या पर्यायात 1,500 रुपये RD/FD मध्ये जमा केले जातील आणि 1,000 रुपये डिजिटल वॉलेटमध्ये दिले जातील. दुसऱ्या पर्यायात संपूर्ण 2,500 रुपये RD किंवा FD मध्ये गुंतवण्याची सुविधा असेल.
अर्जासाठी दिल्ली सरकारच्या अधिकृत पोर्टलवर जाऊन ऑनलाइन नोंदणी करावी. अर्जासोबत आधार कार्ड, मतदार ओळखपत्र, उत्पन्नाचा दाखला, राहण्याचा दाखला आणि बँक खात्याची माहिती अपलोड करून अर्ज सादर करावा.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.