Baramati News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जुलै महिन्यात फूट पडल्यानंतर यंदाचा पवार कुटुंबियांच्या गोविंदबागेतील दिवाळी पाडव्याकडे बारामतीकरांसह सपूर्ण राज्याचे लक्ष लागलेले होते.या सोहळ्याला उपमुख्यमंत्री अजित पवार उपस्थित राहणार का याविषयी गेल्या काही दिवसांपासून चर्चांना उधाण आले होते. पण अखेर अजितदादा गोविंदबागेत दाखल झाले असल्याची माहिती समोर येत आहे.तसेच ते पवार कुटुंबाच्या स्नेहभोजनाला उपस्थित राहण्याची शक्यता आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उपमुख्यमंत्री अजित पवार हे मंगळवारी सायंकाळी पावणे आठच्या सुमारास बारामतीमधील गोविंदबागेत दाखल झाले आहेत. त्यांच्यासह पत्नी सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवारही देखील यावेळी उपस्थित आहेत.
पवार कुटुंबीय एकत्र स्नेहभोजन करणार आहेत. मागील काही दिवसांपासून पवार कुटुंबियांच्या दिवाळी पाडव्याला अजित पवार उपस्थित राहणार की नाही याविषयीच्या चर्चांना उधाण आले होते.
महाराष्ट्राचे राजकारण हे कायमच शरद पवार यांच्याभोवती फिरत आले आहे. पण यंदा जुलै महिन्यात अजित पवारांसह 40 आमदारांनी शरद पवारांची साथ सोडली.राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजित पवारांनी (Ajit Pawar) भाजपसोबत सत्तेतही सहभागी झाले.तसेच त्यांनी राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्हावरही दावा ठोकला.
या सगळ्या घडामोडीनंतर पवार कुटुंबाच्या दिवाळी पाडव्याला अजितदादा उपस्थित राहणार की नाही,याविषयी चर्चा जोर धरू लागली होती. पण अजित पवार दुपारी अनुपस्थित राहिले होते.यावर शरद पवार (Sharad Pawar) यांनी प्रतिक्रिया दिली होती.यानंतर पार्थ पवारने शरद पवारांची भेट घेतली होती.
शरद पवार म्हणाले होते, काही कामं असतील. रोहित यांचा दौरा सुरू आहे. प्रत्येकाची काही कामं आहेत, कुणाचा आजार असेल. कुणाचा व्यक्तिगत आजार असेल.त्यामुळे समज-गैरसमज करण्याचं कारण नाही तसेच तुम्ही स्थानिक आहात. आज मला लोक भेटायला आलेले पाहिले. त्यात काही कमतरता दिसली का? अशी विचारणाही पवार त्यांनी यावेळी केली.
बारामती तालुक्यातील काटेवाडी येथे अजित पवार यांच्या घरी पवार कुटुंबियांची भाऊबीज असते. या ठिकाणी संपूर्ण पवार कुटुंबीय एकत्र येतात.अजित पवार यांनी आज दिवाळी पाडव्याला अनुपस्थित राहिले असले तरी खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांनी मात्र आपण काटेवाडीत भाऊबीजेला जाणार असल्याचे सांगितले आहे, त्यासाठी त्यांनी राजकीय भूमिका वेगळी आणि कौटुंबिक संबंध वेगळे असे अनेकदा स्पष्ट केले आहे. त्यानुसार सुळे या उद्या काटेवाडीत भाऊबीजेला जाणार आहेत.
(Edited By Deepak Kulkarni)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.