Supriya Sule vs Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Vs Supriya Sule : अमेरिकेतील पत्रकारावरून ताई, दादा आमने-सामने; 'दादांचे ते वक्तव्य...' सुप्रिया सुळेंची टीका!

Sudesh Mitkar

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाकडून शनिवारी बारामती लोकसभा मतदारसंघासाठीचा प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला. यावेळी अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटावर विविध मुद्द्यांच्या आधारे निशाणा साधला.

अजित पवार यांनी न्यूयॉर्क टाईमचे पत्रकार बारामती मध्ये आले का ? आणण्यात आले असा सवाल करत शरद पवार गटावरती निशाणा साधला, याला आता खासदार सुप्रिया सुळे यांनी उत्तर दिले आहे.

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाकडून परवा प्रचाराचा नारळ वाढवण्यात आला हा राजकीय इव्हेंट देशभरातील पत्रकारांसह अमेरिकेतील न्यूयॉर्क टाइम्स या संस्थेचे पत्रकार देखील आले होते. आता याच मुद्द्यावरून दोन्ही गटांमध्ये राजकारण रंगल्याचे पाहायला मिळत आहे. अजित पवारांनी काल बारामती मधून या न्यूयॉर्क टाईमच्या पत्रकारांना विमानाचे पैसे देऊन आणण्यात आलं होतं का? असा सवाल करत, विमानाचे येण्या-जाण्याचे पैसे दिले तर कोणीही येऊ शकतं असं दादा म्हणाले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यावर सुप्रिया सुळे यांना विचारले असता सुळे म्हणाल्या, याबाबत मी तुमच्याकडून ऐकत आहे. हे वक्तव्य अत्यंत हास्यास्पद आहे. न्यूयॉर्क टाईमचा माणूस जो साउथ ईस्ट एशिया पाहतो तो बारामतीला येतो आणि आमची मुलाखत घेतो यात आमचा काय संबंध? हा प्रश्न न्यूयॉर्क टाईम्सला विचारायला हवा असा टोला सुप्रिया सुळे यांनी लगावला.

मी केलेला कामांचे श्रेय सुप्रिया सुळे घेत असल्याचे टीका अजित पवार यांनी केली होती, त्याबाबत बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, आम्ही एकत्र होतो त्यामुळेच सर्व विकासकामे आम्ही एकत्रित केली आहे. माझ्यावर केंद्राच्या स्कीमची जबाबदारी होती. तर दादा पालकमंत्री उपमुख्यमंत्री आणि फायनान्स मिनिस्टर म्हणून योजना राबवत होते.

इंदापूरमध्ये भरणे मामा आणि मी एकत्रित काम केलं तसेच बारामतीमध्ये रमेश आप्पा आणि मी एकत्रित काम केलं, भोरमध्ये संग्राम थोपटे आणि पुरंदरमध्ये जगताप सोबत होते. तर पुण्यामध्ये दत्ता धनकवडे, विशाल तांबे, सचिन दोडके सर्वांनी एकत्रित काम केलं आहे.आमचा पक्ष एकच होता. आम्ही सर्व काम टीम म्हणून केली असल्याचं सुप्रिया सुळे यांनी खुलासा केला.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी शरद पवार यांच्यावर टीका करतान पवार कृषी मंत्री असताना शेतकऱ्यांवर अन्याय झाल्याचं म्हटलं आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या, चंद्रशेखर बावनकुळे यांना प्रांजळपणे एकच गोष्ट सांगायची आहे की शरद पवार यांनी पन्नास वर्षे देशात आणि महाराष्ट्राचे काम केलं आहे. त्याचाच गौरव त्यांच्याच पक्षाने त्यांना पद्मविभूषण देऊन केला आहे. याची आठवण बावनकुळे यांना करून द्यावी असं वाटत असल्याचं सुप्रिया सुळे म्हणल्या.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT