Parth Pawar News : बारामती लोकसभेसाठी खडकवासल्याची खिंड पार्थ पवार लढवणार!

Baramati Lok Sabha Constituency : बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी पताका कोणाची झळकणार हे खडकवासला मतदारसंघ ठरवणार
Parth Pawar
Parth PawarSarkarnama
Published on
Updated on

Khadakwasla Constituency News : आगामी लोकसभा निवडणुकीमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघातून विजयी पताका कोणाची झळकणार हे खडकवासला मतदारसंघ ठरवणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबतची कल्पना पूर्वीपासून असल्याने महाविकास आघाडीचे उमेदवार सुप्रिया सुळे यांनी मागील एक वर्षापासून खडकवासला मतदारसंघांमध्ये फिल्डिंग लावली आहे.

सुप्रिया सुळे यांच्या या भागामध्ये प्रचाराच्या दोन-तीन फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत. तर त्या प्रमाणात महायुती कुठेतरी मागे पडल्याचे पाहायला मिळत आहे. हीच तफावत भरून काढण्यासाठी पार्थ पवारांनी कंबर कसली असून खडकवासला मतदारसंघाचे खिंड लढवण्यासाठी ते या मतदारसंघांमध्ये काही दिवसांपासून ठाण मांडून आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Parth Pawar
Amol Kolhe On Ajit Pawar : "23 जागा घेणाऱ्या नेतृत्वाला...," अमोल कोल्हेंनी अजितदादांना डिवचलं !

पुणे शहराच्या लगत असलेल्या खडकवासला विधानसभा मतदारसंघ हा नेहमीच भाजपाच्या पारड्यात आपलं मताधिक्य टाकताना दिसला आहे. या ठिकाणी तब्बल साडेपाच लाख मतदार असून या मतदारसंघातलं मिळणार लीड हे उमेदवारांसाठी महत्त्वाचे ठरणार आहे. कारण इतर पाच विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन्हीही उमेदवारांमध्ये तोडीस तोड मुकाबला होऊन गणित कुठेतरी बरोबरी सुटण्याची चिन्ह दिसत आहेत. अशात खडकवासला मतदारसंघातून जो निर्णायक अशी आघाडी घेईल. त्याला बारामती चा गड सर करणे सोपे जाणार असल्याचे बोलले जात आहे.

मात्र या मतदारसंघात अध्यापयी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचारासाठी जोर लावलेला नाही. त्यामुळे अजित पवारांनी पार्थ पवार यांच्याकडे या मतदारसंघाची जबाबदारी दिली आहे. पार्थ पवार हे मागील काही दिवसांपासून या भागात सक्रीय झाले आहेत असे सांगण्यात येत आहे. पार्थ पवार हे विशेष करून शहरी भाग असलेल्या नेर्हे,वारजे, कोथरूड,कोंढवे -धावडे, कर्वेनगर, धायरी, उत्तम नगर, सिंहगड रस्त्याचा काही भाग, वडगाव, नांदेड सिटी या भागात फिरत आहेत. पार्थ यांच्यावर या भागातील राष्ट्रवादी आणि भाजपच्या माजी नगरसेवकांना सोबत घेऊन प्रचाराची जबाबदारी देण्यात आली.

Parth Pawar
Rohit Pawar Vs Ajit Pawar : पवारांवर बांदलांची टीका; रोहित पवारांचा अजितदादांना खडा सवाल; म्हणाले...

खडकवासला विधानसभा मतदारसंघात भाजप आणि शिवसेनेची ताकद राहिले आहे. त्यामुळे २०१४ मध्ये भाजपसोबत महायुतीतून कप बशिवर लढलेल्या महादेव जानकर यांना चांगले मताधिक्य मिळाले होते. तर, २०१९ मध्येही भाजपच्या त्यावेळच्या उमेदवार कांचन कुल यांनाही या मतदारसंघातून लीड मिळालेले आहे.

या दोन निवडणुकीमध्ये खडकवासला मतदार संघातील मतदारांपर्यंत उमेदवार हे पोहोचले नव्हते. त्यामुळे जे काही मतदान झाले ते फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने झाले असल्याचं बोललं जात आहे. यांना मात्र खडकवासला विधानसभा मतदारसंघांमध्ये दोन्ही बाजूंकडून जोरदार प्रचार यंत्रणा राबवण्यात आली आहे. त्यामुळे या निवडणुकीत फक्त पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपच्या नावावरती मतदान मिळणे थोडासा अवघड झाला आहे.

या ठिकाणी प्रचार हा उमेदवार केंद्रित करण्यात आला आहे. अशा परिस्थितीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचा उमेदवार आणि पक्षाचे चिन्ह हे मतदारांपर्यंत पोहोचवणे राष्ट्रवादी काँग्रेससाठी महत्त्वाचे असणार आहे. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसच्या घड्याळाला मतदान म्हणजेच पंतप्रधान नरेंद्र मोदींना मतदान हे देखील मतदारांना ठासून सांगावे लागणार आहे. हा विडा आता पार्थ पवारांनी उचलला असून ते हे आव्हान पेलणार का हे पाहावे लागणार आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com