Ajit Pawar on Liquor Ban Sarkarnama
पुणे

Ajit Pawar on Liquor Ban : राज्यभरात दारूबंदी होणार...? अजित पवारांनी केला खुलासा

Ajit Pawar On Prohibition of Alcohol : देशातील इतर राज्यांमध्ये दारूबंदी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील दारूबंदी होणार का? याबाबत चर्चा सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठे विधान केलं आहे.

Sudesh Mitkar

Pune Political News : कल्याणीनगर अपघात प्रकरणांमध्ये अल्पवयीन आरोपीला 'पब'मध्ये दारू दिल्याचे आणि या दारूच्या नशेत त्यांनी गाडी चालवली असल्याचा प्रकार समोर आला आहे. यानंतर अल्पवयीन मुलांना दारू देणाऱ्या आणि अनधिकृतपणे उशिरापर्यंत पब सुरू ठेवणाऱ्या हॉटेल्सवर कारवाईचा बडगा प्रशासनाकडून उगरण्यात येत आहे.

या सगळ्या प्रकरणामुळे तरुणांमध्ये वाढत असलेलं मद्यपानाचे प्रमाण हा विषय ऐरणी वरती आला आहे. त्यामुळे विविध समाज माध्यमातून दारूबंदी विषयीच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे ज्याप्रमाणे देशातील इतर राज्यांमध्ये दारूबंदी करण्यात आली आहे. त्याच पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात देखील दारूबंदी होणार का? याबाबत चर्चा सुरू असतानाच राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी याबाबत मोठे विधान केलं आहे.

पुणे दौऱ्यावरती असताना अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महाराष्ट्रात पूर्णपणे दारूबंदी लागू करण्याबाबत प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले, 'दारूबंदीचा निर्णय हा सरकारच्या पातळीवर होत असतो. आजपर्यंत जेवढी काही सरकार आली त्यातील कोणताही सरकारने दारूबंदीबाबत निर्णय घेतलेला नाही. मात्र, काही जिल्ह्यांमध्ये आपण दारूबंदी केली आहे. वर्धा, चंद्रपूर या ठिकाणी दारूबंदीचा निर्णय घेण्यात आला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दारूबंदीचा निर्णय हा धोरणात्मक असतो. यापुढे नव्याने राज्यामध्ये दारूच्या दुकानांना परवानगी देण्यात येऊ नये असा ठराव झाला आहे. त्यानंतर आपण नव्याने दारूची दुकाने सुरू करण्यास परवानगी देणे बंद केले आहे. दारूबंदीच्या बाबत नव्याने आलेल्या मागणी बाबत आचारसंहिता संपल्यानंतर विचार करता येईल सध्या सहा तारखेपर्यंत आचारसंहिता असून कोणत्याही धोरणात्मक बैठका घेणे शक्य नसल्याचं अजित पवार (Ajit Pawar) यांनी सांगितले.

राज्यातील जे गंभीर विषय आहे. ज्यामध्ये लोकांना पिण्याचे पाणी मिळत आहे का? चाऱ्याच्या संदर्भात प्रश्न प्रलंबित आहेत का ?कुठे अवकाळी पाऊस पडला आहे का ? पावसात नुकसान झालेल्या भागात पंचनामे झालेत का? शेतकऱ्यांना बियाणं खत मिळत आहेत का? याबाबतचा आढावा मुख्यमंत्र्यांसह (Eknath Shinde) आमच्याकडून घेण्यात येत असून आचारसंहिताचा भंग न होता ज्या ज्या गोष्टी करता येतील त्या आमच्याकडून करण्यात येत असल्याचं अजित पवार यांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT