Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : अजित पवारांचे मोठं विधान; म्हणाले, 'बारामतीमधील उमेदवार ठरवताना...'

Sachin Waghmare

Baramti News : बारामतीच्या लोकसभा निवडणुकीत सुनेत्रा पवार यांचा झालेला पराभव उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे. त्यामुळे आता आगामी काळात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामतीमध्ये मेळावा घेत त्यांनी बारामतीकरांना काही प्रश्न विचारात चेंडू त्यांच्या कोर्टात टाकला आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीत इतकी विकासाची कामे करूनही पराभव झाला. दुसरा आमदार मिळाला तर दोघांच्या कामाची तुलना करा. इतर कुणी आमदार मिळाला पाहिजे का ? असा सवाल त्यांनी केला. आम्ही फुले शाहू आंबेडकरांची विचारधारा सोडली नाही. अर्थसंकल्पात मी लिहिले आहे. बारामतीत माझ्याशिवाय नेतृत्व पाहिजे का? असा सवाल त्यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीकरांना विचारला.

बारामतीत वेगळी भूमिका न घेता ही माझा पराभव झाला. तुम्ही सर्वांनी आता तुमची मते सांगा, त्यावर अंतिम निर्णय मी घेणार आहे. बारामतीमधील उमेदवार ठरवताना आपल्या सर्वांची मते विचारात घेणार आहे. बारामतीचा उमेदवार ठरविताना आपली मते उपयुक्त ठरतील, असेही अजित पवार यांनी बारामतीमधील मेळाव्यात बोलताना स्पष्ट केले.

कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांनी मोठ्या मनाने सर्वांना सोबत घेऊन काम केले पाहिजे. काहींचे राजीनामे घेतले. त्यांनीही लक्ष दिले पाहिजे. पद असेल तर काम करेल, नाही तर नाही करणार, अशी भूमिका घेऊ नका. काही चूकत असेल तर मला सांगा. गावातील वरिष्ठ आणि वडिलधाऱ्या मंडळींना भेटलं पाहिजे. त्यांचा आदर ठेवा, असेही त्यांनी कार्यकर्त्यांना सांगितले.

महाराष्ट्रात पाच वर्षात एवढी कामे झाली नसेल तेवढी कामे बारामतीत झाली आहेत. एक वर्ष कोरोनात गेलं आणि एक वर्ष सत्तेत नव्हतो. नाही तर आणखी कामे झाली असती. काही वेगळ्या अफवा उठल्या तर लगेच विश्वास ठेवू नका. राज्याची जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) मला दिली. मला राज्यात फिरावेच लागणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

रोखठोक बोलणारा म्हणून माझी ओळख आहे. बारामती शहर असो गावं असतील आपण विकास करत आहोत. विकास कामांना प्राधान्य कसं देता येईल हे आपण पाहिलं पाहिजे. विकास करणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे. काही महत्त्वाचे निर्णय घेताना आपण लोकांचं मत घेतो. शेवटी निर्णय मीच घेतो. पण मतं जाणून घेतलं तर निर्णय घेताना फायदा होता. आजही मी काही सेवानिवृत्त अधिकाऱ्यांशी बोलून त्यांचंही मत जाणून घेत असतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT