Sanjay Jagtap
Sanjay Jagtap Sarkarnama
पुणे

Bazar Samiti Result : अजितदादांकडून शिवतारेंना पुन्हा धोबीपछाड; नीरेत महाविकास आघाडीचा दणदणीत विजय

संतोष शेंडकर

Neera Bazar Samiti : नीरा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत विरोधी पक्षनेते अजित पवार आणि माजी राज्यमंत्री विजय शिवतारे आमने-सामने आले होते. या दोन्ही नेत्यांमुळे ही निवडणूक महाविकास आघाडीसह युतीसाठी प्रतिष्ठेची बनली होती. यात महाविकास आघाडीच्या पॅनलने युतीच्या पॅनलचा सुपडासाफ केला. नीरा बाजार समितीवर महाविकास आघाडीने १८-० असे वर्चस्व निर्माण केले आहे.

सत्ताधारी महाविकास आघाडीने (MVA) सुरुवातीलाच व्यापारी मतदारसंघातील जागा बिनविरोध पटकावल्या. त्यानंतर १६ जागांच्या लढतीत युतीने आव्हान दिले होते. सोसायटी मतदारसंघात महाविकास आघाडीने ९८७ ते १३०० मतांच्या फरकाने युतीला धूळ चारली. तोलारीची जागेवरही ४७ मतांच्या फरकाने विजय मिळविला. दरम्यान, ग्रामपंचायत मतदारसंघात मात्र युतीने सत्ताधाऱ्यांच्या नाकीनऊ आणले. यामध्ये महाविकास आघाडीने ६४ ते ११७ अशा फरकाने विजय प्राप्त केला. युतीला सासवड, जेजुरी, नायगाव, परिंचेतून चांगली मते मिळाली.

नीरा बाजार समितीच्या (Neera Bazar Committee) निवडणुकीत अजित पवार (Ajit Pawar) यांच्या मार्गदर्शनाखाली महाविकास आघाडीच्या नेतृत्वातील पॅनलचे नेतृत्व आमदार संजय जगताप (Sanjay Jagtap), जिल्हा बँकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, सोमेश्वरचे अध्यक्ष पुरूषोत्तम जगताप यांनी केले. तर युतीच्या पॅनलचे नेतृत्व माजी मंत्री विजय शिवतारे (Vijay Shivtare), भाजप नेते जालिंदर कामठे, गंगाराम जगदाळे यांनी केले होते.

सोसायटी मतदारसंघ

सर्वसाधारण : संदीप फडतरे (१२८६), अशोक निगडे (१३२४), देविदास कामठे (१३५५) (काँग्रेस पुरंदर), वामन कामठे (१३४३), शरद जगताप (१३२८) (राष्ट्रवादी पुरंदर), पंकज निलाखे (१२९३), बाळासाहेब जगदाळे (१३४१) विरुद्ध बाबुराव गडदरे (३३१), आनंद जगताप (३२१), प्रवीण जगताप (३४०), सुरेश जेधे (२९०), पंकज धिवार (३०९), बाळासाहेब बालगुडे (३३०), शारदा भापकर (३०८)

महिला राखीव: शाहजान शेख (१३६५), शरयू वाबळे (१४०९) विरुद्ध सारिका थोपटे (३७८), सोनाली कामथे (३६६)

इतर मागास प्रवर्ग : महादेव टिळेकर (१५०९) विरुद्ध दिलीप गिरमे (२०६)

भटक्या विमुक्त जाती जमाती: भाऊसाहेब गुलदगड (१४२४) विरुद्ध बाळासाहेब खोमणे (३५६)

ग्रामपंचायत मतदारसंघ

सर्वसाधारण: गणेश होले (५७३), बाळू सोमा शिंदे (५५५) विरुद्ध दिलीप कटके (४४७), भारत मोरे (४१८)

आर्थिक दुर्बल : मनिषा नाझीरकर (५३५) विरुद्ध सुशील ताकवले (४७१)

अनुसूचित जाती जमाती - सुशांत कांबळे (५५८) विरुद्ध राजेंद्र गद्रे (४४१)

हमाल तोलारी मतदारसंघ

विक्रम दगडे (८२) विरुद्ध नितीन दगडे (३५)

व्यापारी मतदारसंघ

अनिल माने, राजकुमार शहा (बिनविरोध)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT