Shirur Lok Sabha Constituency 2024 Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News: आढळरावांना विरोध करणाऱ्या मोहितेंची समजूत काढण्यात अजितदादा यशस्वी होणार का?

Shirur Lok Sabha Constituency 2024: आढळरावांना जर राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर आपण राजकारणातून संन्यास घेणार असल्याचे यापूर्वी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी सांगितले आहे.

Mangesh Mahale

Pune Political News: शिरूर लोकसभा मतदारसंघात (Shirur Lok Sabha Constituency 2024) महायुतीचं अखेर ठरलं असून, विद्यमान खासदार अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांच्या विरोधात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao adhalrao Patil) मैदानात उतरणार आहेत. एकेकाळी राष्ट्रवादीचे कट्टर विरोधक असलेले शिवाजीराव आढळराव पाटील यांना अजित पवार रिंगणात उतरवणार आहेत.

आढळरावांची उमेदवारी निश्चित झाली आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते हे आढळरावांना असलेल्या विरोधावर ठाम आहेत. त्यांची समजूत काढण्यासाठी आज अजित पवार हे (Ajit Pawar) मोहितेंच्या निवासस्थानी त्यांची भेट घेणार आहेत. त्यांची समजूत काढणार असल्याची माहिती आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महायुतीत शिरूरची जागा राष्ट्रवादी काँग्रेसला मिळाली आहे. आढळरावांच्या उमेदवारीला शिरूरमधून काही नेते, कार्यकर्त्यांचा विरोध आहे. हा विरोध टाळण्यासाठी अजित पवार शिरूर मतदारसंघातील नाराज पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत.

आढळराव अन् राष्ट्रवादी काँग्रेस यांच्यातील २० वर्षांचा संघर्ष आहे. आढळरावांना जर राष्ट्रवादीने उमेदवारी दिली तर आपण राजकारणातून संन्यास घेणार असल्याचे यापूर्वी खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटलांनी सांगितले आहे.

आढळरावांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश दिल्यास त्यांचे काम करण्यापेक्षा राजकारण सोडून घरी बसेल. मात्र, आढळरावांना मदत करणार नाही, अशी ठाम भूमिका मोहिते पाटलांनी घेतली आहे. अजितदादांना मोहितेंचे समजूत काढण्यात यशस्वी होतीत का, आज समजेल. मोहिते पाटील अजितदादांचा शब्द पाळणार का? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.

शिरूर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असेल, याबाबत चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरू होती. शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे नाव मंगळवारी फायनल झाले आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे.

विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे (Amol Kolhe) यांची उमेदवारी काही दिवसांपूर्वीच फायनल झाली आहे. कोल्हेंचा पराभव करण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. अजितदादांना कोल्हेंच्या विरोधात आढळरावांना उमेदवारी देऊन तगडे आव्हान दिले आहे.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT