Amol Kolhe News
Amol Kolhe News Sarkarnama

Shirur Lok Sabha Election 2024: अखेर ठरलं! शिरूरमध्ये आढळराव अन् कोल्हे पुन्हा भिडणार

Shirur Lok Sabha Constituency 2024:शिरूर लोकसभा लढवून आढळरावांना गेल्या निवडणुकीतील उट्टे काढण्यासाठी संधी मिळाली आहे. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हेंनी आढळरावांना धूळ चारली होती.
Published on

Pune News: शिरूरमधून (Shirur Lok Sabha Election 2024) शिवाजीराव आढळराव पाटील (Shivajirao adhalrao Patil) यांना लढण्याची सूचना अजित पवार गटाकडून (Ajit Pawar) देण्यात आली आहे. शिरूर मतदारसंघातील आमदारांची मते जाणून घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसकडून आढळरावांना उमेदवारी देण्याचे निश्चित झाल्याची माहिती आहे. बारामती लोकसभा मतदारसंघानंतर आता शिरूरमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसकडून उमेदवाराची घोषणा करण्यात आली आहे.

गेल्या काही दिवसांपासून शिरूर लोकसभेसाठी महायुतीचा उमेदवार कोण असेल, याबाबत चर्चा सुरू होती. आता माजी खासदार शिवाजीराव आढळराव-पाटील यांचे नाव फायनल झाले आहे. महाविकास आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडे आहे. विद्यमान खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची उमेदवारी काही दिवसांपूर्वीच फायनल झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

यानिमित्ताने शिरूर लोकसभा लढवून आढळरावांना गेल्या निवडणुकीतील उट्टे काढण्यासाठी संधी मिळाली आहे. 2019च्या लोकसभेच्या निवडणुकीत कोल्हेंनी आढळरावांना धूळ चारली होती. त्यामुळे आढळरावांचा खासदारकीचा चौकार हुकला. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत आता आढळराव आणि कोल्हे पुन्हा भिडणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

कोल्हेंचा पराभव करण्याची घोषणा अजित पवारांनी केली आहे. अजितदादांना कोल्हेंच्या विरोधात आढळरावांना उमेदवारी देऊन तगडे आव्हान दिले आहे. शिरूरसाठी तयारीला लागा, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले असल्याचे आढळरावांनी सोमवारी 'सरकारनामा'ला सांगितले होते.

Amol Kolhe News
Nashik Loksabha 2024: नाशिकसाठी भाजपचा हट्ट; शिंदे गटाचाही सूचक इशारा!

शिवाजीराव आढळराव पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्यातील मतेभद जगजाहीर आहेत. दिलीप मोहिते पाटलांनी आढळरावांच्या उमेदवारीला विरोध केला आहे. आता मोहिते पाटील काय भूमिका घेणार, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. दिलीप मोहीत पाटलांची अजित पवार समजूत काढतील का, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे. "पक्षाने मला आढळराव यांचा प्रचार करण्यास सांगितले तर मी राजकारण सोडून घरी बसेन," असे म्हणणारे दिलीप मोहिते आता काय निर्णय घेणार हे लवकरच समजेल.

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com