Ajit Pawar during the ceremonial pooja of a new Toyota Fortuner in Baramati, advising the owner to follow all traffic regulations.  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : नवी फॉर्च्यूनर घेऊन आलेल्या कार्यकर्त्याचे लाड अजितदादांनी पुरवले अन् जाताजाता मुद्द्यालाच हात घातला...

Ajit Pawar Performs Fortuner Pooja in Baramati : बारामती दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विद्या प्रतिष्ठान कॅम्पस येथे उभारण्यात येत असलेल्या ए.आय. सेंटर ऑफ एक्सलन्सच्या इमारतीची पाहणीही केली.

Sudesh Mitkar

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज बारामती दौऱ्यावर आहेत. या दौऱ्यादरम्यान त्यांनी विविध विकासकामांची पाहणी केली. यावेळी अजितदादांना एका कार्यकर्त्यांने नव्याने खरेदी केलेल्या फॉर्च्यूनर गाडीचे पूजन करण्याची विनंती केली. कार्यकर्त्याने आग्रहच केल्याने दादांनी त्या कार्यकर्त्याला नाराज न करता गाडीचे पूजन देखील केले. मात्र, पूजन करत कार्यकर्त्यांना मोलाचा सल्ला देखील दिला आहे.

बारामती दौऱ्यात अजित पवार यांनी विद्या प्रतिष्ठान कॅम्पस येथे उभारण्यात येत असलेल्या ए.आय. सेंटर ऑफ एक्सलन्सच्या इमारतीची पाहणी केली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाशी संबंधित तांत्रिक माहिती घेतली आणि त्यानुसार आवश्यक सूचना दिल्या. आपल्या विद्यार्थ्यांना जागतिक दर्जाचं शिक्षण आणि अत्याधुनिक तंत्रज्ञान कौशल्य उपलब्ध करून देणं हा आमचा ध्यास आहे. नव्या पिढीला भविष्यातील रोजगार व संशोधनाच्या संधींसाठी सक्षम बनवण्याच्या दिशेनं हा उपक्रम महत्त्वाचा ठरणार आहे, असं यावेळी बोलताना ते म्हणाले.

त्यापूर्वी त्यांनी बारामतीतील तीन हत्ती चौकातील ध्वजस्तंभ व इतर प्रगतीपथावरील विकासकामं, महापुरुषांच्या प्रस्तावित पुतळ्यांचे सादरीकरण, बारामती बस स्थानक परिसर, गुणवडी चौकातील शॉपिंग कॉम्प्लेक्स आणि अधिकारी-कर्मचारी निवासस्थाने आदी विकासकामांचा आढावा घेत पाहणी केली. या सर्व प्रकल्पांची कामं नियोजित वेळेत व दर्जेदाररित्या पूर्ण व्हावीत, यासाठी संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक त्या सूचना केल्या.

पाहणी दौरा आटोपून पवार सहयोग निवासस्थानी आल्यानंतर एका कार्यकर्त्याने आपल्या गाडीचे पूजन करण्याचा आग्रह धरला. पवार यांनी फॉर्च्यूनर कारचे पूजन देखील केले. पूजन केल्यानंतर वाहनाचे नियमांचे पालन करून आपण वाहन चालवावे, असा सल्ला देखील पवार यांनी कार्यकर्त्याला दिला.

अजित पवार म्हणाले, चांगली आणि सुरक्षित गाडी चालवा, नियमाचे कुठेही उल्लंघन करू नका. नियम पाळूनच गाडी चालवा. काल मी पुण्यात होतो, त्यावेळी पाहिलं लोक नियम पाळत नाहीत आणि त्या ठिकाणी अपघात होतात. नियम पाहूनच गाडी चालवावी, असा मोलाचा सल्ला अजित पवार यांनी आपल्या कार्यकर्त्याला दिला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT