Praful Patel, Ajit Pawar, Sunetra Pawar
Praful Patel, Ajit Pawar, Sunetra Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar NCP : अजित पवार गटाला लवकरच केंद्रात मंत्रीपद; महायुतीतील नेत्याची माहिती

Sunil Balasaheb Dhumal

Maharashtra Political News : लोकसभा निवडणुकीत महायुतीची धूळधाण झाल्यानंतर कॅबिनेट मंत्रि‍पदासाठीही रस्सीखेच झाली होती. केंद्रीय राज्यमंत्री स्वतंत्र कारभार पद देऊनही अजित पवार गटाने ते नाकारले. त्यानंतर बारामतीतून पराभूत झालेल्या सुनेत्रा पवारांची राज्यसभेवर वर्णी लागली. आता त्यांना मंत्रिपद मिळणार असल्याची चर्चा आहे.

त्यास दुजोरा देत महायुतीतील आरपीआयचे नेते, केंद्रीय मंत्री रामदास आठवलेंनी अजित पवार गटास लवकरच मंत्रीपद मिळणार असल्याचे स्पष्ट केले आहे.

लोकसभा निवडणुकीत अजित पवार Ajit Pawar गटाला पाचपैकी एका जागेवर समाधान मानावे लागले. त्यानंतर मोदींच्या मंत्रिमंडळात एक राज्यमंत्रीपद देण्यात आले. मात्र आम्ही प्रफुल पटेल यांना मंत्रीपद देणार असून ते पूर्वी कॅबिनेट मंत्री होते. आता त्यांना राज्यमंत्रीपद कसे द्यायचे, असा प्रश्न उपस्थित करून अजित पवार गटाने मंत्रीपद नाकारले.

दरम्यान, राज्यसभेसाठी पक्षातून ज्येष्ठ नेते छगन भुजबळ Chhagan Bhujbal इच्छुक असतानाही सुनेत्रा पवारांची वर्णी लागली. त्यामुळे भुजबळ नाराज असल्याच्याही चर्चा झाल्या. मात्र राजकारणात मागे-पुढे होत असते, असे म्हणत भुजबळांनी नाराज नसल्याचे सांगितले. आता अजित पवार गटास केंद्रात मंत्रीपद मिळणार असल्याचे बोलले जात आहे.

राज्यसभेत बिनविरोध खासदार झाल्यानंतर सुनेत्रा पवारांनी Sunetra Pawar मंत्रीपद मिळाले तर काम करायला आवडेल, असे सूचक विधान केले होते. आता त्यांना मंत्रीपद मिळणार असल्याची चर्चाही जोर धरू लागली आहे. त्यातच लोणावळ्यात आलेल्या रामदास आठवलेंनी अजित पवार गटाला लवकरच केंद्रात एक मंत्रीपद दिले जाणार असल्याची माहिती दिली आहे.

विधानसभेत दहा जागांची मागणी

महायुतीत विधानसभा जागा वाटपाचा तिढा आणखीन वाढणार आहे. केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनीही दहा जागांवर दावा केला आहे. लोकसभेत आम्हाला एक ही जागा मिळाली नाही, तरी आम्ही जोमाने काम केले. महायुतीच्या निवडणूक आलेल्या १७ खासदारांमध्ये आरपीआयचा मोठा वाटा आहे. त्यामुळे येत्या विधानसभेत आम्हाला महायुतीने आठ ते दहा जागा मिळाव्यात, असा दावा आठवलेंनी केला आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT