Ajit Pawar
Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar News : ....तर मलासुद्धा टायरमध्ये घाला : अजित पवार असं का म्हणाले?

कल्याण पाचांगणे

माळेगाव (जि. पुणे) : बारामती तालुक्यातील पाहुणेवाडी परिसरातील अवैध धंदावरून राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार आज प्रचंड आक्रमक झाले होते. ‘पवारसाहेब, सुप्रिया आणि मी स्वतः बारामती-पाहुणेवाडी परिसरातल्या दारूभट्ट्या बंद करतो. तुम्ही सरकारचा पगार मात्र घ्या, अशा शब्दांत अजितदादांनी पोलिसांना सुनावले. (Ajit Pawar gave strict instructions to the police regarding the illegal business)

बारामती (Baramati) तालुक्यातील पाहुणेवाडी येथील एका कार्यक्रमात अजित पवार (Ajit Pawar) यांनी बारामतीतील अवैध धंद्यासंदर्भात भाष्य केले. ते म्हणाले की, पवारसाहेब, सुप्रिया सुळे आणि मी स्वतः पाहुणेवाडी परिसरातल्या दारूभट्ट्या बंद करतो. सरकारचा पगार मात्र पोलिस घेतील, एवढेच आता आमच्याकडून राहिले आहे, असा उपरोधिक टोला अजित पवार यांनी मारत माळेगाव पाहुणेवाडी परिसरातील अवैध दारू धंद्यासंदर्भात पोलिसांना धारेवर धरले.

पोलिस अधिकाऱ्यांना सूचना देताना ते म्हणाले की, कारवाई इतकी आक्रमक करा की उद्या अजित पवारांची भट्टी असली तरी मलासुद्धा टायरमध्ये घाला. परंतु एकही दारू धंदेवाल्याला सोडू नका. इतक्या आक्रमक भाषेत पवार यांनी पोलिस यंत्रणेला बजावले. पुढच्या वेळेस या परिसरात कार्यक्रमाला आलो, तर लोकांनी मला तुमच्या पोलिस कामगिरीबद्दल सांगयला हवं, अशी अपेक्षा या वेळी पवार यांनी केली.

पाहुणेवाडी येथे राष्ट्रवादी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटन निमित्ताने अजित पवार यांची जाहीर सभा पार पडली, सरपंच भगवानराव तावरे या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. जनसंपर्क कार्यालयाच्या उद्‌घाटन प्रसंगी झालेल्या सभेत अवैध धंद्यासंदर्भात आलेले निवेदन अजित पवार यांनी उपस्थितांपुढे वाचून दाखवले.

निवेदनामध्ये परिसरात दारू भट्ट्यांचे वाढते प्रमाण लोकांच्या आरोग्याच्या दृष्टीने आणि सार्वजनिक शांततेच्या दृष्टीने घातक ठरत चाललेले आहे. महिला आणि मुलींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने गावामध्ये पूर्णतः दारू बंद झाली पाहिजे, अशी आग्रही मागणी करण्यात आलेली होती.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT