Ajit Pawar, Devendra Fadnavis
Ajit Pawar, Devendra Fadnavis News Sarkarnama
पुणे

NCP Vs BJP in Pune : अजित पवारांना महायुतीतून बाहेर काढा, म्हणणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याची फडणवीसांकडे मोठी मागणी

Sachin Waghmare

Pune News : लोकसभा निवडणुकीमध्ये महाराष्ट्रात महायुतीला पराभवाला सामोरे जावे लागले आहे. लोकसभेच्या 48 जागांपैकी अवघ्या 17 जागांवर महायुतीला विजय मिळवता आला. यामुळे गेल्या काही दिवसापासून विविध पातळ्यांवर पराभवाची समीक्षा केली जात आहे. अजित पवार यांना सोबत घेतल्याने महायुतीला निवडणुकीत फटका बसला, अशी चर्चा सुरु आहे.

त्यातच आता पुणे जिल्ह्यातील भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी एका बैठकीवेळी अजित पवार (Ajit Pawar) यांना महायुतीमधून बाहेर काढण्याची मागणी केली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले असताना आता त्याच पदाधिकाऱ्याने माझ्या जिवितास धोका निर्माण झाला असून गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मला संरक्षण द्यावे, अशी मागणी केली आहे. (NCP Vs BJP in Pune)

लोकसभा निवडणूक पार पडल्यानंतर राज्यात महायुतीला दारुण पराभव स्वीकारावा लागल्याने या पराभवाची कारणे शोधली जात आहेत. त्यातच संघाच्या ऑर्गनायझर या मुखपत्राने अजित पवार यांना सोबत घेतल्याने महायुतीला निवडणुकीत फटका बसल्याचे म्हटले होते. त्यामुळे भाजपच्या संघटनेतूनही अजित पवार यांना महायुतीतून बाहेर काढा, अशी मागणी करण्यात आली.

भाजप आमदार राहुल कुल (Rahul Kul) यांच्या समोरच भाजपचे पुणे जिल्हा उपाध्यक्ष आणि पुणे बाजार समितीचे संचालक सुदर्शन चौधरी यांनी गुरुवारी शिरूर लोकसभा आढावा बैठकीमध्ये ही खदखद बोलून दाखवली. त्यानंतर भाजप व राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी या मुद्यावरून एकेमकांवर आरोप-प्रत्यारोप करीत असल्याने वातावरण चांगलेच तापले आहे.

त्यानंतर काही राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी आक्रमकपणे सुदर्शन चौधरी यांच्यावर टीका टिपण्णी केली. त्यावर हा प्रकार थांबला नाही तर काही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीच्या ॲाफीसमध्ये येऊन घोषणाबाजी केली. त्यामुळे वातावरण चांगलेच तापले आहे.

या प्रकरणानंतर लगेचच गुरुवारी सायंकाळी सुदर्शन चौधरी यांनी ट्विट करीत 'मी जनभावना व्यक्त केली म्हणून राष्ट्रवादीचे (Ncp) कार्यकर्ते येऊन घोषणाबाजी करत आहेत, माझ्या जिवितास धोका निर्माण झाला असून देवेंद्रजी मला संरक्षण द्यावे अशी विनंती.' त्यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. त्यामुळे आता या प्रकरणी फडणवीस यांच्याकडून काय कारवाई केली जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.

दरम्यान, दादांविषयी चुकीचं बोललो असेल तर मी दिलगिरी व्यक्त करतो, असे म्हणत भाजपचे पदाधिकारी सुदर्शन चौधरी यांनी गुरुवारी रात्री उशिरा दिलगिरी व्यक्त करीत या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT