Mankar and Rohit Pawar Sarkarnama
पुणे

Rohit Pawar Vs Ajit Pawar NCP: ...मग जितेंद्र आव्हाड गुंड नाहीत का? ; अजित पवार गटाचा रोहित पवारांना सवाल!

Deepak Mankar Pune NCP News : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी रोहित पवारांना प्रत्युत्तर दिले आहे.

Sudesh Mitkar

Pune NCP News : राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर अजित पवार भाजपा आणि शिंदे गटासोबत सरकारमध्ये सहभागी झाले. यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात राजकीय संघर्ष सुरु झाला आहे. आता आरोप-प्रत्यारोपाचं राजकारण सध्या पाहायला मिळत आहे. यातच आमदार रोहित पवार यांनी आपल्या विरोधात अजित पवार गुंडांचा वापर करत असल्याचा आरोप केला आहे. यावर आता अजित पवार गटाकडून प्रतिक्रिया आली आहे.

रोहित पवार(Rohit Pawar) यांनी बुधवारी विधानसभा परिसरात बोलताना मला अडचणीत आणण्यासाठी आमच्या काकांनी (अजित पवार यांनी) माझ्या मतदारसंघातील एका गुंडांला जवळ केलं आहे", असा गंभीर आरोप  केला होता. त्यावर अजित पवार काय बोलणार ही उत्सुकता असतानाच राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे पुणे शहराध्यक्ष दीपक मानकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दीपक मानकर(Deepak Mankar) म्हणाले, रोहित पवार यांना गुंडांची नक्की व्याख्या काय आहे हे समजले नाही. नेमकं गुंड कोणाला म्हणावं ज्यांची ईडीची चौकशी झाली आहे ते का? रोहित पवार म्हणतात ते गुंडा आहे असं म्हणत त्यांनी रोहित पवारांना खोचक टोला लगावला.

रोहित पवार हे सातत्याने खोटी टीका करून प्रसिद्धीमध्ये राहण्याचा प्रयत्न करत आहेत. रोहित पवार हे सातत्याने गुंड गुंड म्हणत असतील तर त्यांच्यासोबत असलेले जितेंद्र आव्हाड हे गुंड नाहीत का? जितेंद्र आव्हाड(Jitendra Awhad) यांच्यावर 27 गुन्हे दाखल आहेत. मग त्यांना गुंड म्हणता येणार नाही का? असा सवाल मानकर यांनी केला.

रोहित पवार हे सातत्याने आमच्या मागे गुंडांची गर्दी असल्याची टीका करत आहेत. त्यांच्या मागे गर्दी नसल्याने त्यांना हे सुचत आहे. त्यांच्या टिकाना आम्ही महत्त्व देत नसल्याचं मानकर म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT