Shirur Lok Sabha Election 2024 : अजितदादा खासदार कोल्हेंना धोबीपछाड करणारा उमेदवार शिरुरमध्ये देतील ?

Ajit Pawar News : शिरुरमध्ये उमेदवारीचा तिढा कायम...
Shirur Lok Sabha Election 2024 : Ajit Pawar : Amol Kolhe
Shirur Lok Sabha Election 2024 : Ajit Pawar : Amol KolheSarkarnama
Published on
Updated on

Pimpri Chinchwad News : शिरुर लोकसभा कोणी लढवायची यावरून महायुतीतील शिवसेना आणि अजित पवार राष्ट्रवादीत मोठी रस्सीखेच आतापर्यंत सुरु होती. त्यात राष्ट्रवादीने मंगळवारी रात्री बाजी मारली. त्यामुळे त्यांना मावळवरील क्लेम आता त्यांना सोडावा लागणार आहे. दरम्यान शिरुर युतीत कोणत्या पक्षाने लढवायची हे फिक्स झाले असले, तरी तेथे उमेदवार कोण? हे मात्र अद्याप ठरलेले नाही. त्यामुळे त्याची उत्कंठा आणि चुरस तेथे बाकीच आहे. (Shirur Lok Sabha Election 2024)

Shirur Lok Sabha Election 2024 : Ajit Pawar : Amol Kolhe
Solapur NCP : सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बडा नेता अजितदादांची साथ सोडणार

दुसरीकडे आघाडीकडून शिरुरला राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे विद्यमान खासदार डॉ.अमोल कोल्हे हेच पुन्हा उमेदवार फायनल झाले आहेत. त्यामुळे अजित पवार आणि शरद पवार या दोघांनीही आपल्या प्रतिष्ठेची केलेल्या आणि त्यामुळे संपूर्ण राज्याचे राज्याचे लक्ष लागलेल्या मतदारसंघात दोन्ही राष्ट्रवादीतच लढत होणार असल्याचे जवळपास नक्की झाले आहे. त्यात कोण बाजी मारणार हे निकालानंतर कळेल. (Latest Marthi News)

राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!

युतीच्या जागावाटपात शिवसेनेकडे असलेली आणि 2014 पर्यंत सलग तीनवेळा त्यांचा खासदार झालेली शिरुरची जागा अजित पवारांनी यावेळी आपल्या प्रतिष्ठेची केल्याने ती त्यांना सोडण्यात आल्याचे कळते. कारण त्यांनी तेथे कोल्हेंचा पराभव करण्याचा विडा उचलला आहे. (Latest Political News)

दरम्यान ही जागा राष्ट्रवादीला मिळणार असल्याने मावळवरचा क्लेम आता त्यांना सोडावा लागणार आहे. तेथे युतीतील शिंदे शिवसेनेचे विद्यमान खासदार श्रीरंग बारणे यांनी स्वत:च त्यांची उमेदवारी जाहीर करून टाकली आहे. तर त्यानंतर त्याला आव्हान देत ही जागा राष्ट्रवादीने लढविण्याची मागणी पक्षाचे मावळचे आमदार सुनील शेळके यांनी केली आहे. मात्र शिवसेनेची खेडची जागा घेतल्याने युतीच्या जागावाटपात त्यांच्याकडे असलेली मावळची जागा राष्ट्रवादीला आता सोडावीच लागेल. त्यामुळे बारणेंना मोठा दिलासा मिळणार आहे.

Shirur Lok Sabha Election 2024 : Ajit Pawar : Amol Kolhe
Shirur Lok Sabha Seat : अजितदादांचा गेम प्लॅन, शिरूरच्या मैदानात कोल्हेंच्या विरोधात पार्थ पवार..

शिरुरमध्ये उमेदवारीचा तिढा कायम -

दरम्यान शिरुर कोणी लढवायचे हे महायुतीत ठरले असले, तरी तेथे कोण उमेदवार? हे मात्र ठरलेले नाही. त्याचा पेच आणि सस्पेंस कायम आहे. शिरुरला माजी खासदार आढळराव यांना राष्ट्रवादी काँग्रेस उमेदवारी देण्यात येणार असल्याची चर्चा होती. मात्र, पुणे म्हाडाचे सभापतीपद देऊन त्यांचे पुनर्वसन नुकतेच केले गेले. त्यानंतर त्यांचाही ठाम आग्रह कमी झाल्याचे दिसून आले. शिवाय त्यांच्या राष्ट्रवादीच्या (NCP) संभाव्य उमेदवारीला त्यांचे कट्टर राजकीय शत्रू या पक्षाचे खेडचे आमदार दिलीप मोहिते-पाटील यांनी आज कडाडून विरोध केला.

आढळराव पक्षाचे उमेदवार असतील, तर घरी बसेल, असा बंडाचा झेंडा त्यांनी आताच फडकावला त्यामुळे तेथून पुणे जिल्हा परिषदेचे माजी जिल्हा परिषद अध्यक्ष प्रदीप कंद यांचे नाव पुढे आले आहे. मात्र ते भाजपमध्ये आहेत. पूर्वी ते राष्ट्रवादीतच होते. युतीतील तिन्ही पक्षांचे नेते (मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार) हे उमेदवारीबाबत जो निर्णय घेतील तो आपल्याला मान्य असेल, असे कंद यांनी आज सरकारनामाला सांगत शिरुरमधून तयारीत असल्याचेच सूचित केले. त्यामुळे त्यांना तिकिट मिळते की कोल्हेंना (Amol Kolhe) धोबीपछाड करेल, असा दुसरा उमेदवार अजितदादा देतात? याकडे आता लक्ष लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com