Baramati News : शिंदे-फडणवीस बारामतीत; सर्वांचे लक्ष असणार शरद पवारांकडे...

Ajit Pawar On Namo Rojgar Mela : ज्या संस्थेच्या मैदानात हा रोजगार मेळावा पार पाडतो आहे त्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत...
Baramati News
Baramati News Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : बारामतीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या 'नमो रोजगार' मेळाव्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस हे उपस्थित राहणार आहेत. मात्र या कार्यक्रमाचं निमंत्रण आपल्याला मिळालं नसल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितले आहे.

असे असले तरी दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार मात्र या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. त्यांच्याकडून जाहीर करण्यात आलेल्या दौऱ्यामध्ये या कार्यक्रमासाठी शनिवारी सकाळीच अकरा ते एक ही वेळ राखीव ठेवण्यात आली आहे. हे सगळे नेते एकाच कार्यक्रमाला उपस्थित राहणार असल्याने राजकीय वर्तुळात या कार्यक्रमाबद्दल चर्चा रंगल्या आहेत. यावेळी शरद पवार नेमके काय बोलणार? याकडे सर्वांच्याच नजरा लागून आहेत. (Baramati Political News)

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Baramati News
BJP Pune: विरोधकांची अनामत रक्कम जप्त करा; उपमुख्यमंत्र्यांचे कार्यकर्त्यांना आवाहन

येत्या 2 व 3 मार्च रोजी बारामती येथे आयोजित 'नमो महारोजगार मेळाव्या’साठी आत्तापर्यंत पुणे, सातारा, सांगली, सोलापूर व कोल्हापूर जिल्ह्यातील औद्योगिक तसेच इतर सेवा क्षेत्रातील 300 पेक्षा जास्त खाजगी उद्योजकांनी सहभाग दर्शविला असून त्यांच्याकडून विविध प्रकारची 40 हजार पेक्षा जास्त रिक्तपदे कळविण्यात आली आहेत.

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागामार्फत या मेळाव्याचे विद्या प्रतिष्ठानचे कला, वाणिज्य, विज्ञान महाविद्यालय, बारामती येथे सकाळी 10 ते सायंकाळी 5 या वेळेत आयोजन करण्यात आले आहे. या पदांकरीता 10 वी, 12 वी कोणत्याही शाखेतील पदवीधर अथवा पदविकाधारक, पदव्युत्तर पदवी, आयटीआय, अभियांत्रिकी पदवी इत्यादी पात्रता असणारे स्त्री-पुरुष उमेदवार, शिकाऊ उमेदवारी योजनेसाठी पात्र उमेदवार यांना संधी असणार आहेत. मेळाव्याच्या माध्यमातून जवळपास 43 हजार युवक युवतींना रोजगाराच्या संधी प्राप्त होणार आहेत.

Baramati News
Solapur NCP : सोलापूर जिल्ह्यातील राष्ट्रवादीचा बडा नेता अजितदादांची साथ सोडणार

निवडणूक आयोगाने राष्ट्रवादी पक्ष आणि चिन्ह अजित पवार यांना दिल्यानंतर पहिल्यांदाच अजित पवार आणि शरद पवार हे एका कार्यक्रमाला येणार आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे देखील असणार आहेत. विद्या प्रतिष्ठान येथील 12 एकराच्या मैदानावर या मेळाव्याचे आयोजन करण्यात आलं आहे.

ज्या संस्थेच्या मैदानात हा रोजगार मेळावा पार पाडतो आहे त्या संस्थेचे अध्यक्ष शरद पवार आहेत तर सुप्रिया सुळे विश्वस्त आहेत. मात्र सुप्रिया सुळे यांनी आपल्याला अद्याप निमंत्रण मिळाले नसल्याचं सांगितलं आहे. मुख्यमंत्री यांनी दोन उपमुख्यमंत्र्यांच्या स्वागताला आपण जाणार असल्याचं सुप्रिया सुळे यांनी सांगितला आहे.

सुप्रिया सुळे (Supriya Sule) म्हणाल्या, "बारामतीच मी लोकप्रतिनिधी असल्याने माझी नैतिक जबाबदारी आहे की मी त्यांचं स्वागत करावं आणि 'अतिथि देवो भवं', हे आधीपासून शिकवलं गेलं आहे. या विद्याप्रतिष्ठानच्या संस्थेत आतापर्यंत अनेक दिग्गज येऊन गेले. शरद पवारांच्या आमंत्रणानेच हे लोक इथे आले. त्यामुळे बोलवलं तर मी नक्की जाईन', असं सुप्रिया सुळे म्हणाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह तीन पक्षातील नेते या कार्यक्रमाला उपस्थिती लावणार असल्याने हा प्रशासकीय कार्यक्रमाचा मंच राजकीय आखाडा बनू शकतो असं राजकीय विश्लेषकांचं मत आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com