Malegaon : समृद्ध महाराष्ट्राचे व्हिजन उपमुख्यमंत्री अजित पवारांकडे आहे, त्यामुळे अजितदादा हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुखी महाराष्ट्राचे स्वप्न पूर्ण करतील, असा विश्वास बारामती तालुका सहकारी दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे यांनी व्यक्त केला. (Ajit Pawar has a vision of a prosperous Maharashtra: Poptrao Gawde)
बारामती दूध संघाचे नवनिर्वाचित अध्यक्ष पोपटराव गावडे यांचा कऱ्हावागज येथे सत्कार करण्यात आला. त्यात कार्यक्रमात गावडे यांनी हे विधान केले आहे. सध्या अनेक नेते राज्याच्या विकासाला गती देण्याचे काम करीत आहेत. मात्र, त्या सर्वांमध्ये उपमुख्यमंत्री अजित पवारांचे (Ajit Pawar) काम हे उजवे होणार आहे. कारण दादांकडे राज्याच्या विकासाचे व्हीजन आहे. त्यामुळे पवार हे सुखी महाराष्ट्राचे स्वप्न साकारतील, असा विश्वासही गावडे यांनी बोलून दाखविला.
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रामाणिकपणे काम करणाऱ्या कार्यकर्त्याला मोठ्या पदावर पोचण्याची संधी दिली जाते, याचे बारामती (Baramati) दूध संघाचे अध्यक्ष पोपटराव गावडे हे उत्तम उदाहरण आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून गावडे यांनी गोरगरिबांच्या समस्या सोडविण्याचा प्रयत्न केला आहे, असे राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनी सांगितले.
पुणे जिल्ह्यात पूर्वी म्हणजे १९७५ च्या अगोदार बारामती तालुका सहकारी दूध संघ आणि पुणे जिल्हा दूध संघ होते. त्या काळात बारामती दूध संघाला अल्प प्रमाणात दूध मिळत होते. मात्र, अजित पवार यांनी धुरा हाती घेतल्यापासून बारामती दूध संघाने शेतकऱ्यांचा विश्वास संपादीत करत संकलन मोठ्या प्रमाणात वाढले आहे. इतर संघापेक्षा दोन पैसे अधिकचे शेतकऱ्यांना देण्यात येत आहेत, असे पुणे जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष सतीश खोमणे यांनी स्पष्ट केले.
पुणे जिल्हा बँकेचे संचालक दत्तात्रेय येळे, माळेगाव सहकरी साखर कारखान्याचे संचालक मदनराव देवकाते, दूध संघाचे संचालक संदीप जगताप, योगेश जगताप, बारामती सह बॅकेचे अध्यक्ष सचिन सातव, बारामती कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनील पवार, राजेंद्र रायकर, प्रशांत खलाटे उपस्थित होते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.