Sharad Pawar On Government : सध्या सरकारशी बोलणं अडचणीचं; पण मी, ठाकरे आणि थोरातांनी ठरवलं तर...: पवारांचे भाष्य

मधल्या काळात उद्धव ठाकरे यांना माहिती नसेल. त्या मर्यादित काळात मुख्यमंत्री असताना दोन गोष्टी आम्ही तुमच्या सरकारकडून करून घेतल्या.
Sharad Pawar
Sharad PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाचे कार्य सध्या धुळ्यात सुरू आहे. त्या कामाला प्रोत्साहन दिलं पाहिजे. राज्य सरकारशी आम्हा लोकांना (उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि शरद पवार) बोलणं सध्या जरा अडचणीचं आहे. पण, त्यात आज ना उद्या काहीतरी मार्ग निघतील. ज्या वेळी मार्ग निघतील. त्यावेळी राज्य सरकारलासुद्धा मदत करायला भाग पाडणं, यात काय अडचण येणार नाही. या ठिकाणी उद्धव ठाकरे, बाळासाहेब थोरात आणि मीसुद्धा आहे. आम्ही तिघांनी ठरवलं तर कदाचित काही होईल महाराष्ट्रामध्ये. त्याच्यामध्ये विशेष वेगळं सांगायची गरज नाही, अशा शब्दांत ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राजकीय स्थितीवर भाष्य केले. (At present we are having a little difficulty talking to state government: Sharad Pawar)

इतिहासाचार्य वि. का. राजवाडे संशोधन मंडळाच्या सहा ऐतिहासिक ग्रंथांचे प्रकाशन आज (ता. ३० जुलै) मुंबईत यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar), माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थितीत करण्यात आले. या वेळी विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुण गुजराथी उपस्थित होते.

Sharad Pawar
Uddhav Thackeray Statement: दिल्लीला पाणी पाजण्याची प्रेरणा आपण घेतली पाहिजे; नाही तर....: उद्धव ठाकरेंचे सूचक व्यक्तव्य

पवार म्हणाले की, महाराष्ट्रातील साहित्यीक, सांस्कृतिक व अशा ज्या संस्था आहेत. त्याच्यातील जो खजिना आहे, तो जतन केला पाहिजे, तो वाढता ठेवला पाहिजे आणि त्यासाठी राज्य सरकारने अशा संस्थांच्या पाठीशी राहिलं पाहिजे. मधल्या काळात उद्धव ठाकरे (Uddhav thackeray) यांना माहिती नसेल. त्या मर्यादित काळात मुख्यमंत्री असताना दोन गोष्टी आम्ही तुमच्या सरकारकडून करून घेतल्या.

मुंबईतील एका संस्थेचा अध्यक्ष मी आहे. त्या संस्थेला पाच कोटींची देणगी देण्यात आली होती. ती रक्कम त्या ठिकाणी पोचली. अशा संस्थांना राज्य सरकारकडून मदत देण्याची खबरदारी यापूर्वी आम्ही लोकांनी घेतली. तसंच काम आजही करण्याची गरज आहे, अशी अपेक्षाही पवारांनी व्यक्त केली.

Sharad Pawar
Maval NCP : पोलिसांनी ‘टायपिंग मिस्टेक’ केली अन्‌ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आरोपी बनले...

धुळ्यात आज जे काम सुरू आहे. राजवाडे यांच्या नावाने संस्था सुरू आहे. त्या संस्थेचे योगदान लक्षात घेतल्यानंतर हे काम चालू राहिलं पाहिजे. तसेच ऐतिहासिक घटनांचा परिचय महाराष्ट्राला करून देण्याचे काम मंडळाच्या वतीने केले पाहिजे, असे पवार यांनी नमूद केले.

Sharad Pawar
BJP Shock To Jankar : भाजपने दुसऱ्यांदा फोडला मित्रपक्ष रासपचा आमदार; महादेव जानकरांच्या भूमिकेकडे लक्ष

ते म्हणाले की, यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानचा अध्यक्ष या नात्याने माझ्यावर एक जबाबदारी आहे. आम्ही एक लहानसं काम करत असतो. लेखनाच्या क्षेत्रात काम करणारा राज्यातील खेड्यापाड्यात मर्यादित शिकलेला; पण उत्तुंग लेखक असेल अथवा कोणी जाणकार असतील तर अशा लोकांना आम्ही काहींना काही तरी मदत यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानच्या वतीने करत असतो. तशाच प्रकारची मदत या राजवाडे इतिहास संशोधन संस्थेला जाहीर करतो. ते लवकरच दिलं जाईल, अशी ग्वाही देतो. हे काम तुम्ही चालू ठेवा. महाराष्ट्र आणि राज्यातील नव्या पिढीला त्याची गरज आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com