Maval NCP : पोलिसांनी ‘टायपिंग मिस्टेक’ केली अन्‌ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष आरोपी बनले...

खांडगे यांनी स्थानिक पोलिसांच्या नजरेस ती चूक आणून दिली. त्यानंतर पोलिसांची एकच पळापळ सुरु झाली. शेवटी पोलिसांवर लेखी खुलासा करण्याची नामुष्की आली.
Maval NCP
Maval NCPSarkarnama

Pimpri News : पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात राजकीय खूनसत्रामुळे कायदा आणि सुव्यवस्थेवरून पिंपरी-चिंचवड पोलिसांवर चौफेर टीका होत आहे. त्यातच पोलिसांचा आणखी भोंगळ कारभार शनिवारी (ता. २९ जुलै) पुन्हा चव्हाट्यावर आला. कोणताही संबंध नसताना राष्ट्रवादी काँग्रेसचे मावळ तालुकाध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे नगपरिषदेचे माजी नगरसेवक गणेश खांडगे यांना एका गुन्ह्यात तळेगाव दाभाडे पोलिसांनी आरोपी केले. त्यामुळे खांडगे यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला, तसेच बदनामीही झाली. (Police made a 'typing mistake' and maval taluk president of NCP became an accused...)

पोलिसांच्या (police) कामात ही अक्षम्य चूक होऊन त्यासंदर्भातील बातम्या व्हायरल होऊन मोठी चर्चा झाली, त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मावळ (Maval) तालुकाध्यक्ष खांडगे यांनी स्थानिक पोलिसांच्या नजरेस ती चूक आणून दिली. त्यानंतर पोलिसांची एकच पळापळ सुरु झाली. शेवटी पोलिसांवर लेखी खुलासा करण्याची नामुष्की आली.

Maval NCP
BJP Shock To Jankar : भाजपने दुसऱ्यांदा फोडला मित्रपक्ष रासपचा आमदार; महादेव जानकरांच्या भूमिकेकडे लक्ष

‘एफआयआर’मध्ये चुकून निष्पाप व्यक्तीचे नाव आल्याने ते वगळण्यासाठी उद्या (सोमवारी, ता. ३१ जुलै) न्यायालयात अर्ज करणार असल्याचे या गुन्ह्याचे तपासाधिकारी तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यातील पीएसआय मारूती मदेवाड यांनी ‘सरकारनामा’ला आज सांगितले. दरम्यान, दररोजच्या गुन्ह्याची माहिती पोलिस प्रेसनोट काढून वरिष्ठ, सीआयडी, आयबी आदी सर्व विभागांना देतात. तिकडेही त्यांना खुलासा द्यावा लागणार आहे.

Maval NCP
Congress MLA Will Split? : काँग्रेस आमदार अस्वस्थ, महाआघाडीतून फुटून भाजपत प्रवेश करणार; भाजप खासदाराचा गौप्यस्फोट

पोलिसांनी शनिवारी यासंदर्भात माध्यमांना माहिती दिली. त्यानंतर लगेच बातम्या व्हायरल झाल्या आणि हा खरा प्रकार समोर आला. पण, तोपर्यंत फोन सारखा वाजत होता. स्पष्टीकरण देता देता नाकीनऊ आले. नाहक मोठा मनस्ताप झाला, असे खांडगे यांनी ‘सरकारनामा’ला सांगितले. ‘एफआयआर’ टाईप झाल्यावर तो वाचणे, ही वरिष्ठ पोलिस निरीक्षकांची जबाबदारी असते. त्यांनी ती पार पाडली असती, तर ही चूक टळली असती. मात्र, कामाच्या ताणातून अनावधनाने ही चूक झाल्याने पोलिसांकडून लेखी माफीचा आग्रह धरणार नाही, तशी अपेक्षाही नाही, असेही खांडगे यांनी स्पष्ट केले.

Maval NCP
BJP News : महाराष्ट्राच्या प्रभारीपदावरून हटवलेल्या भाजप नेत्याला लागणार प्रदेशाध्यक्षपदाची लॉटरी!

नेमके काय झाले?

तळेगाव दाभाडे पोलिस ठाण्यात ता. २७ जुलै रोजी एक तक्रार आली. ज्यामध्ये परवानगीशिवाय फिर्यादी सुहास गरुड (वय ४७, रा. तळेगाव दाभाडे) यांच्या मालकीच्या जमिनीवर सागर बारकू भेगडे (वय ३०, रा. सदर) यांनी शिवीगाळ आणि धमकी देत नांगरट केल्याचे म्हटले होते. त्यानुसार फिर्यादीत उल्लेख असलेल्या भेगडेविरुद्धच गुन्हा दाखल होणं, म्हणजे त्यालाच आरोपी करणे अपेक्षित होते. पण, दुसरा आरोपी म्हणून खांडगेंचेही नाव टाकण्यात आले अन पुढे हा मोठा गोंधळ झाला.

Maval NCP
Madha Loksabha : भाजप खासदाराच्या विजयाची जबाबदारी घेतली राष्ट्रवादीच्या बबनदादांनी; दोन लाख मताधिक्क्याची ग्वाही

तातडीने स्पष्टीकरण देण्याची गरज होती..

प्रसिद्धीमाध्यमांना जशी या गुन्ह्याची माहिती प्रेसनोटमधून देण्यात आली. तसा त्यात केलेल्या गफलतीचा खुलासा मात्र पोलिसांनी आजच्या त्यांच्या बुलेटिनमध्ये केला नव्हता. बेअब्रू होईल, या भीतीने दुपारर्यंत स्वतंत्रपणे त्याबाबत काही सांगण्यात आलेले नव्हते. मात्र, तसं स्पष्टीकरण तातडीने करणे आवश्यक आहे. त्याला गरुड आणि खांडगे यांनीही दुजोरा दिला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com