Ajit Pawar On Pruthviraj Chavhan Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Interview : 'ठाकरेंसोबत आनंदाने तर चव्हाणांच्या काळात नाईलाज..' ; अजित पवार असं का म्हणाले?

Ajit Pawar On Pruthviraj Chavhan : अजित पवार चार वेळा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होते.

सरकारनामा ब्यूरो

Ajit Pawar in Pune : ‘सकाळ माध्यम समूहा’तर्फे आयोजित ‘दिलखुलास दादा’ या प्रकट मुलाखतीच्या आज राष्ट्रवादीचे नेते व विरोधीपक्षनेते अजित पवार यांची मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. यामुलाखतीत अजित पवार यांनी विविध प्रश्नांना दिलखुलास उत्तरे दिली. यावेळी राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री कधी होणार? या प्रश्नाला अजित पवारांनी २००४ सालीच राष्ट्रवादीचा मुख्यमंत्री झाला असता, अशी आठवण सांगितली.

अजित पवार चार वेळा उपमुख्यमंत्रीपदी विराजमान होते. उपमुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजित पवार म्हणाले, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि उद्धव ठाकरे या दोघांनाही आमदार पदाचा ही अनुभव नव्हता. या दोघांच्याही काळात मी, उपमुख्यमंत्री पदी काम केले आहे. २०१९ च्या निकालानंतर महाविकास आघाडी तयार झाली, ठाकरेंच्या कार्यकाळात एकत्रिपणे चांगल्या प्रकारे काम केलं, पृथ्वीराज चव्हाणांच्या कार्यकाळात सु्द्धा काम केलं, असे पवार म्हणाले.

अशा परिस्थितीत कधी कधी समाधानाने काम करावं लागतं, तर कधी नाईलाजाने. ठाकरेंच्या कार्यकाळात आनंदाने काम केलं, परंतु पृथ्वीराज चव्हाणांच्या काळात मात्र आम्ही नाईलाजाने काम करावं लागलं, असा गौप्यस्फोट अजित पवारांनी केला.

अजित पवार पुढे म्हणाले, "२००४ मध्ये राष्ट्रवादीला मुख्यमंत्रीपदाची संधी मिळेल एवढ्या जागांची संख्या जनतेने राष्ट्रवादीला दिली होती. काही निर्णय वरिष्ठ पातळीवर घेतले जातात. पक्षाची शिस्त राहावी, यासाठी वरिष्ठ सांगतील तसं ऐकावं लागतं.

"२००४ मध्ये आमची काँग्रेससोबत आघाडीस होती. ७१ जागा आमच्या आल्या होत्या. काँग्रेसच्या लोकांनी मानसिकता केलेली होती की, राष्ट्रवादीला मुख्यमंत्री पद जाईल. मात्र काय घडामोडी घडल्या माहिती नाही. निरोप आला की, आपल्याकडे उपमुख्यमंत्री राहणार. विधिमंडळात आमच्या सदस्यांनी आर आर पाटील हे मुख्यमंत्री म्हणून निवड केली होती. आर आर पाटील मुख्यमंत्री म्हणून दिसले असते. पण नाही आम्हाला संधी मिळाली, असेही अजित पवार म्हणाले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT