sharad pawar | ajit pawar  sarkarnama
पुणे

Sharad Pawar : पक्षांतर्गंत हुकूमशाहीला विरोध करत दादांचा बडा नेता साहेबांच्या भेटीला; ‘तुतारी’ फुंकण्याचे दिले संकेत

Umesh Patil : गेल्या काही दिवसांपासून मोहोळमध्ये उमेश पाटील विरुद्ध राजन पाटील, असा संघर्ष तीव्र झाला आहे. यातच राजन पाटील यांना बळ देण्याचे काम सुरू असल्यानं उमेश पाटील यांनी बंडाचं निशाण फडकविण्याची तयारी सुरू केली आहे.

Sudesh Mitkar

Pune News : राष्ट्रवादी काँग्रेसचे ( शरदचंद्र पवार ) अध्यक्ष शरद पवार यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी नेत्यांची रीघ लागली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसचे ( अजितदादा पवार ) मुख्य प्रवक्ते उमेश पाटील हेही शरद पवार यांच्या भेटीसाठी पुण्यातील ‘मोदी बाग’ येथे आले.

पिंपरी चिंचवडचे माजी आमदार विलास लांडे, जुन्नरचे आमदार अतुल बेनके यांचे बंधू शरद पवार ( Sharad Pawar )  यांच्या भेटीसाठी ‘मोदी बाग’ येथे आले आहेत. भाजपचे नेते, पृथ्वीराज जाचक हे सुद्धा शरद पवार यांची भेट घेणार आहेत. यातच उमेश पाटील हे शरद पवार यांच्या भेटीला आल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे.

अनगर अप्पर तहसील कार्यालय, राजन पाटील यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा दिल्यामुळे आधीच नाराज असलेल्या उमेश पाटील यांना मोहोळमधील सभेत उपमुख्यंत्री अजितदादा पवार यांनी फटकारलं होतं. यानंतर उमेश पाटील यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता. त्यानंतर ते राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) की शिवसेनेत ( ठाकरे गट ) जाणार, याची चर्चा मोहोळच्या राजकारणात रंगली आहे.

उमेश पाटील ( Umesh Patil ) यांनी पक्ष सोडू नये, यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादीकडून मनधरणीचे प्रयत्न सुरू आहेत. असं असताना उमेश पाटील हे शरद पवार यांच्या पुण्यातील ‘मोदीबाग’ निवासस्थानी भेटीसाठी आल्यानं ते राष्ट्रवादी काँग्रेस ( शरदचंद्र पवार ) पक्षात प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तवली जात आहे.

माध्यमांशी संवाद साधताना उमेश पाटील म्हणाले, “शरद पवार यांना भेटता येतंय, हे माझं भाग्य आहे.  सोलापूर जिल्ह्यातील हुकूशाही आणि दडपशाहीला माझा पूर्वीपासून विरोध राहिला आहे. तो विरोध राष्ट्रवादी एक संघ असल्यापासून आहे. मतदारसंघातील परिस्थिती आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये ( शरदचंद्र पवार ) पक्षात जायचं का नाही, याबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा करणार आहे.”

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT