Rajan Patil-Umesh Patil : राजन पाटलांच्या उमेदवाराचा पराभव हेच आमचे टार्गेट; उमेश पाटलांनी रणशिंग फुंकले

Mohol Politics : देश स्वातंत्र झाला. पण, आपला मोहोळ तालुका आजही पारतंत्र्यात आहे. मोहोळ तालुक्याला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपली लढाई आहे.
Umesh Patil
Umesh Patil Sarkarnama
Published on
Updated on

Solapur, 10 October : माजी आमदार राजन पाटील यांच्या विरोधातील झेंडा आपण हाती घेण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात आणि देशात काय विचार चालला आहे. याच्याशी आपल्याला काही देणं घेणं नाही. फक्त राजन पाटील यांच्या उमेदवाराचा पराभव करणे, हेच आपले ध्येय आहे. त्याद्वारे मोहोळ मतदारसंघाला आपल्याला स्वातंत्र्य मिळवून द्यायचं आहे, अशी भूमिका उमेश पाटील यांनी आज मेळाव्यात मांडली.

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आगामी निवडणुकीची रणनीती ठरवण्यासाठी मोहोळ मतदारसंघातील कार्यकर्त्यांचा जनसंवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्या मेळाव्यात बोलताना उमेश पाटील (Umesh Patil) यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. या वेळी मतदारसंघातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उमेश पाटील म्हणाले, देश स्वातंत्र झाला. पण, आपला मोहोळ तालुका आजही पारतंत्र्यात आहे. मोहोळ तालुक्याला (Mohol Taluka) स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी आपली लढाई आहे. ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर आणि नेत्यांवर वीस वर्षे निष्ठा ठेवली, त्या पक्षाचा आणि नेत्याचा मोहोळ तालुक्यासाठी त्याग करण्याची तयारी मी ठेवली आहे.

Umesh Patil
Karmala Politics ; संजय शिंदेंच्या कार्यपद्धतीवर नारायण पाटलांचा हल्लाबोल; ‘मीच करमाळ्याचा सर्वस्व अन मी सांगेल तीच पूर्वदिशा’

भविष्याचा आणि करिअरचा विचार न करता पवार कुटुंबीय आणि अजितदादांसोबतचे संबंध बाजूला ठेवून मोहोळ तालुक्यातील जनतेला मी शब्द दिला आहे. त्याला बांधील राहण्याची माझी भूमिका राहणार आहे. उमेश पाटील कुठल्याही परिस्थितीत डगमगणार नाही आणि मोडणारही नाही, असा इशाराही उमेश पाटील यांनी दिला.

ते म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या मुख्य प्रवक्तेपदाचा राजीनामा देण्याचा निर्णय मी घेतला आहे. त्या निर्णयानंतर विविध पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांचे मला फोन आले. काहींनी विधान परिषदेचीही ऑफर दिली आहे. मी सर्व कार्यकर्त्याशी चर्चा करूनच निर्णय घेणार आहे.

Umesh Patil
Hariyana Assembly Result : हरियाणा निकालावर संशय; प्रणिती शिंदेंचे महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीबाबत मोठे भाष्य

आत्मदहनाचा प्रयत्न

मेळावा सुरू असतानाच सचिन चव्हाण या कार्यकर्त्यांने एवढा अपमान होऊनही पुन्हा अजित पवारांकडे कसल्याही परिस्थितीत जायचे नाही, असे सांगून अंगावर पेट्रोल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, उपस्थितीत कार्यकर्त्यांनी त्याला रोखले, त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com