Ajit Pawar 1 sarkarnama
पुणे

Voter list controversy : मतदारांची नावे वगळली, प्रशासनाची पक्षपाती भूमिका, अजित पवारांच्या राष्ट्रवादीकडून 'व्होटचोरी'चा आरोप

Daund Vote Theft Allegation : देशासह राज्यात विरोधकांकडून निवडणूक आयोगावर व्होटचोरीचा आरोप केला जात आहे. मात्र, आता खुद्द महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने देखील व्होट चोरीचा आरोप केला आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनीच व्होट चोरी झाल्याचा आरोप केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

प्रफुल्ल भंडारी

Daund News, 26 Oct : देशासह राज्यात विरोधकांकडून निवडणूक आयोगावर व्होटचोरीचा आरोप केला जात आहे. मात्र, आता खुद्द महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेसने देखील व्होट चोरीचा आरोप केला आहे. त्यामुळे आता सत्ताधाऱ्यांनीच व्होट चोरी झाल्याचा आरोप केल्यामुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

नेमकं प्रकरण काय?

दौंड नगरपालिका प्रशासनाने राज्य निवडणूक आयोगाचा स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंबंधीचा आदेश धुडकावत ठराविकांनी केलेल्या हरकतींचे एकगठ्ठा अर्ज स्वीकारले. त्यानुसार त्यांनी मतदारांची नावे इतर प्रभागात समाविष्ट करणं किंवा वगळण्याची प्रक्रिया सुरू केल्याचा अजब कारभार समोर आला आहे.

प्रशासनाच्या पक्षपाती भूमिकेचा निषेध करत राष्ट्रवादीने व्होटचोरीचा आरोप केला आणि तब्बल 5 पाच ठिय्या आंदोलन केलं. नगरपालिका हद्दीतील एकूण 5500 मतदार वगळण्यासाठी हरकतींचे एकगठ्ठा अर्ज स्वीकारून मतदारांची नावे वगळण्याची प्रक्रिया प्रशासनाने सुरू केली आहे.

या निषेधार्थ राष्ट्रवादी पक्षाने मुख्याधिकारी कक्षात आंदोलन केलं. यावेळी माजी नगराध्यक्ष इंद्रजित जगदाळे, माजी नगराध्यक्ष वीरधवल जगदाळे, पक्ष प्रवक्ता वैशाली नागवडे, तालुकाध्यक्ष नितीन दोरगे, शहराध्यक्ष गुरुमुख नारंग, माजी नगरसेवक जिवराज पवार, स्वप्नील शहा यांनी मुख्याधिकाऱ्यांना संबंधित प्रकाराबाबक विचारणा केली. मात्र, त्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर दिले नाही.

तर नगरपालिका प्रशासनाने अर्जदारांची कोणतीही खातरजमा न करता नावे वगळण्यासाठी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांना पाठवून प्रक्रिया सुरू केली. ज्यांनी हरकती व अर्ज केले त्यांच्या छापील अर्जावरील मोबाईल नंबर आणि वैयक्तिक माहिती विसंगत होती, तरीही प्रशासनाने प्रक्रिया सुरू केली त्यामुळे या पक्षपाती भूमिकेचा निषेध राष्ट्रवादीकडून करण्यात आला.

शिवाय हरकतींनुसार ज्या मतदारांची नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात समाविष्ट करावयाची आहेत, त्यांना त्यासंबंधी नोटीस न देता त्यांचे म्हणणे ऐकून न घेता एका विशिष्ट गटाला निवडणुकीत फायदा व्हावा यासाठी ही प्रक्रिया राबविली जात असल्याचा आरोपही राष्ट्रवादीने केला आहे.

दरम्यान, राष्ट्रवादीने आंदोलन केल्यानंतर अडीच तासांनी विरोधी गटाने मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी करीत ठिय्या आंदोलन केले. त्यानंतर सायंकाळी सातनंतर मुख्याधिकाऱ्यांनी मतदार यादीतील त्रुटीसंदर्भात राज्य निवडणूक आयोग व जिल्हाधिकाऱ्यांचे लेखी मार्गदर्शन घेऊन काम करू, असे पत्र आंदोलनकर्त्यांना दिल्यानंतर आंदोलन स्थगित करण्यात आले.

तर दौंड नगरपालिकेत हरकतींच्या नावाखाली पक्षपाती काम करून मतदारांना मतदानापासून वंचित ठेवून लोकशाही धोक्यात आणणारे अर्जदार व त्यांना साह्य करणारे संबंधित अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल करण्याच्या मागणी राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT