Daund Politics : अजितदादांच्या उपस्थितीत भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या माजी शहराध्यक्षावर नगरपालिकेचं दबावतंत्र

NCP Swapnil Shah Pressure Row : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दौंडमध्ये भाजचे माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आठ दिवसांतच दौंड नगरपालिका प्रशासनाच्या दबावतंत्राला सामोरं जावं लागल्याचं समोर आलं आहे.
Ajit Pawar
Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

Daund News, 25 Oct : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दौंडमध्ये भाजचे माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. त्यानंतर आठ दिवसांतच दौंड नगरपालिका प्रशासनाच्या दबावतंत्राला सामोरं जावं लागल्याचं समोर आलं आहे.

धक्कादायक बाब म्हणजे मतदार यादीतील नावासंबंधी कोणताही अर्ज आला नसतानाही पालिकेने शहा यांची दुकानात जाऊन चौकशी केल्याचा प्रकार समोर आला आहे. तर नगरपालिकेच्या या पक्षपाती भूमिकेच्या निषेधार्थ राष्ट्रवादीकडून वोटचोरीचा आरोप करीत 5 तास ठिय्या आंदोलन करण्यात आलं.

अजित पवारांच्या उपस्थितीत 17 ऑक्टोबर रोजी भाजचे माजी शहराध्यक्ष स्वप्नील शहा यांनी प्रवेश केला होता. मात्र, काल अचानक काही नगरपालिकेचे अधिकारी स्वप्नील शहांच्या दुकानात जाऊन त्यांना तुमचा प्रभाग कोणता? तुम्ही त्याच प्रभागात राहता का, मतदार आहात का? असे प्रश्न विचारले.

Ajit Pawar
Murlidhar Mohol : डॅमेज कंट्रोलसाठी मुरलीधर मोहोळांची धडपड; CM फडणवीसांच्या भेटीनंतर जैन मुनींपुढे नतमस्तक

शिवाय शहा यांच्या कुटुंबियांविषयी चौकशी करताना संबंधित अधिकार्‍यांनी त्यांच्या मतदार यादीतील नावाविषयी प्रश्न उपस्थित केल्यानंतर शहा यांनी ही विचारपूस का करत आहात? असं विचारले असता संबंधितांनी हरकत आल्याचे सांगितले. परंतु प्रत्यक्षात शहा यांच्या नावावर हरकत घेणारा कोणताही अर्ज आलेला नसताना चौकशी करण्यात आली.

त्यामुळे मुख्याधिकारी अवधूत तावडे यांच्या दालनात स्वप्नील शहांनी स्वतः हा प्रकार सांगितल्यानंतर प्रश्न उपस्थित करणारे अधिकारी वाघमोडेंना बोलवण्यात आलं. यावेळी त्यांना हरकत नसताना चौकशी करण्यामागील हेतू विचारला तसंच तुम्ही ही चौकशी कुणाच्या सांगण्यावरून केली? असं विचारलं. मात्र, त्यांनी यावर स्पष्ट उत्तर दिलं नाही. त्यामुळे आता या प्रकरणाची चौकशी करण्याची मागणी राष्ट्रवादीकडून करण्यात येत आहे.

Ajit Pawar
Jaykumar Gore News: जयकुमार गोरेंनी नुसतं पाणीच नाही वळवलं, तर पाच गावांतील मतदानही फिरवलं

दरम्यान, दौंड शहरातील शिवराजनगरमधील घनश्याम निकम नावाच्या मतदाराचे नाव एका माजी नगराध्यक्षाच्या मुलाने ग्रामपंचायत मध्ये समाविष्ठ करण्यासंबंधी नगरपालिकेला दिलेल्या नावांच्या यादीत होते. मात्र, ज्यावेळी घनश्याम निकम नगरपालिकेत स्वतःचे आधारकार्ड आणि रहिवासी पुरावा घेऊन आल्यामुळे नगरपालिकेचा पक्षपातीपणा उघडकीस आला तरीही या प्रकरणावर मुख्याधिकाऱ्यांनी कोणतीही प्रतिक्रिया दिली नाही.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com