Gopal Badne Arrested : डाॅक्टर तरुणीच्या आत्महत्येतील आरोपी PSI गोपाळ बदनेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, 'न्यायालयात...'

Satara Doctor Case Gopal Badne : डाॅक्टर तरुणीच्या आत्महत्येतील आरोपी निलंबित पीएसआय गोपाल बदने याने फलटण पोलिसांसमोर शनिवारी रात्री सरेंडर केले. अटकनेनंतर त्याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.
PSI Gopal Badne
PSI Gopal Badne Sarkarnama
Published on
Updated on

Satara Doctor Case : फलटणमध्ये डाॅक्टर तरुणीने केलेल्या आत्महत्येप्रकरणातील आरोपी निलंबित पीएसआय गोपाळ बदने याने शनिवारी रात्री सरेंडर केले. फलटण पोलिस ठाण्यात तो स्वःहून हजर झाला. पोलिसांनी त्यांना अटक केली असून त्याला न्यायालयात हजर केले जाणार आहे. दरम्यान, अटकेनंतर बदने याने पहिली प्रतिक्रिया दिली आहे.

तो म्हणाला, मी प्रामाणिक आहे. माझा पोलिस प्रशासन आणि न्यायालयावर माझा विश्वास आहे. न्यायालय जो निर्णय देईल त्यावर माझा विश्वास आहे.

डाॅक्टर तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली होती. तिच्या हातावर सुसाईड नोट देखील लिहिलेली होती. त्यामध्ये गोपाळ बदने याने आपल्यावर चार वेळा अत्याचार केल्याचे तसेच प्रशांत बनकर याने मानसिक आणि शारिरीक त्रास दिल्याचा उल्लेख होता. त्यानंतर पोलिसांनी गुन्हा दाखल करत आरोपींचा शोध सुरू केला होता.

प्रशांत बनकर याला पोलिसांनी पुण्यातून अटक केली. तर, गोपाळ बदने हा पोलिसांनी चकवा देत होता. त्याच्या शोधासाठी पोलिसांनी दोन पथके देखील रवाना केली होती. त्याचे शेवटचे लोकेशन देखील पोलिसांनी ट्रेस केले होते. दरम्यान, शनिवारी रात्री तो स्व:ता फलटण पोलिस ठाण्यात सरेंडर झाला.

PSI Gopal Badne
Daund Politics : अजितदादांच्या उपस्थितीत भाजपमधून राष्ट्रवादीत प्रवेश केलेल्या माजी शहराध्यक्षावर नगरपालिकेचं दबावतंत्र

प्रशांत बनकर याला अटक केल्यानंतर शनिवारी पोलिसांनी त्याला न्यायालयात हजर केले होते. न्यायालयाने त्याला चार दिवसांची कोठडी सुनावली आहे. दरम्यान, प्रशांतची बहिण हिने माध्यमांच्यासमोर येत आपला भावाची यात काही चूक नसल्याचे सांगितले. त्याची आणि मृत डाॅक्टरची महिन्याभरापूर्वीच ओळख झाली होती. तिने आपल्या भावाला 15 दिवसांपूर्वी प्रपोज केल्याचे सांगितले.

PSI Gopal Badne
Jaykumar Gore News: जयकुमार गोरेंनी नुसतं पाणीच नाही वळवलं, तर पाच गावांतील मतदानही फिरवलं

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com