Bapu Bhegade Sarkarnama
पुणे

Bapu Bhegade : 'डोक्यावर उभं करेल', अजितदादांच्या नेत्याची अरेरावी

Bapu Bhegade Talegaon Issue News : तळेगाव नगरपालिकेतील महिला कर्मचारी, अधिकाऱ्यांना केली शिवीगाळ.

Chaitanya Machale

Pune News : अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडेंनी महिला अधिकाऱ्यास अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. तळेगाव नगरपालिकेतील मुख्याधिकाऱ्यांच्या कार्यालयातच हा धक्कादायक प्रकार घडला. या प्रकारामुळे तळेगाव नगरपालिकेतील महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांमध्ये नाराजी पसरली आहे.

तळेगाव नगरपालिकेने मिळकत करात वाढ केली आहे. ही करवाढ अवाजवी आहे. असा प्रश्न उपस्थित करत त्याबाबत चर्चा करण्यासाठी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रदेश उपाध्यक्ष बापू भेगडे नगरपालिकेत गेले होते.

भेगडे (Bapu Bhegade) मुख्याधिकाऱ्यांकडे आपले शिष्टमंडळ घेऊन गेले होते. यावेळी पुढील चार वर्ष ही करवाढ होणार असल्याची माहिती देण्यात आली. एक महिना जरी टॅक्स भरायला उशीर झाला तरी दोन टक्के व्याज आकारले जाते, अशी तक्रार शिष्ट मंडळातील व्यक्तींनी केली. दरवर्षी दहा टक्के कर वाढणार आहे, असा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला.

त्यावर तेथील एका महिला अधिकाऱ्याने खुलासा केला. मात्र त्यांनी दिलेलं उत्तर हे उपस्थितांना चुकीचे आणि अवास्तव वाटलं. ही चर्चा सुरू असतानाच खुर्चीवर बसलेले भेगडे हे अचानक चिडले. त्यांनी महिलांना वेडेवाकडे बोलण्यास सुरुवात केली.

त्यावर व्यवस्थित बोला, असे या महिला अधिकाऱ्यांनी भेगडे यांना सुनावले. यामुळे चिडलेल्या भेगडे यांनी 'साहेब तुमच्या कामगारांना व्यवस्थित सांगा, नाहीतर डोक्यावर उभं करीन मी' असे म्हणत अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली.

यानंतर शिष्टमंडळातील इतर नागरिकांनी बापू भेगडे यांना शांत केले. मात्र, या संपूर्ण प्रकारामुळे तळेगाव नगरपालिकेच्या (Talegaon Nagarpalika) कार्यालयात भीतीचे वातावरण पसरले आहे.

महिला कर्मचारी आणि अधिकाऱ्यांना राजकीय पक्षांचे पदाधिकारी अशी शिवीगाळ करून धमकी देणार असतील तर आम्ही काम कसे करायचे असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. आम्ही सरकारने ठरवून दिलेल्या नियमानुसारच काम करतो का आमचे घरचे काम करतो, असा सवालही या महिला कर्मचाऱ्यांकडून उपस्थित केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT