Pune News: पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या निर्मला नवले यांचा सोशल मीडियावर मोठा चाहता वर्ग आहे. सरपंचमॅडम या सोशल मीडियावर पोस्टद्वारे त्यांच्या आयुष्यातील सुख-दु:खाच्या प्रसंगांसह सरपंचपदाच्या कार्यकाळात घेतलेल्या वेगवेगळ्या निर्णयांची माहिती नेहमी देत असतात. राज्यासह पुणे जिल्ह्यातही आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा धुराळा उडाला आहे. सर्वच राजकीय पक्षाच्या इच्छुकांनी उमेदवारीसाठी पक्षनेतृत्वाकडे जोरदार फिल्डिंग लावली आहे. याचदरम्यान, आता कारेगावच्या सरपंच मॅडम यांनीही मोठी घोषणा केली आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सरपंच निर्मला नवले यांच्याकडे काही दिवसांपूर्वीच मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.त्यांच्याकडे राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची धुरा सोपवण्यात आली आहे. तसेच त्या गावच्या राजकारणासह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विविध मेळावे, अधिवेशनं,बैठका यांच्यासह विविध कार्यक्रमांमध्ये अॅक्टिव्ह असल्याचंही अनेकदा दिसून आलं आहे.
पुणे जिल्ह्यातील कारेगावसारख्या मोठ्या गावच्या सरपंचपदाचा बहुमान पटकावल्यानंतर निर्मला नवले आता तालुक्याच्या राजकारणात एन्ट्री घेण्याच्या जोरदार तयारीत आहेत. राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या कार्याध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यानंतर नवले यांची पुढची राजकीय वाटचालही निश्चित झाली आहे. निर्मला नवले (Nirmala Nawale) यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट करत राष्ट्रवादीच्या इच्छुकांमध्ये खळबळ उडवून दिली आहे.
सोशल मीडियावरील पोस्टमध्ये सरपंच निर्मला नवले म्हणतात, "मी आगामी पंचायत समिती निवडणूक लढवण्यास इच्छुक असून पक्षाने माझ्या उमेदवारीचा विचार करावा. राजकारण आणि समाजकारणाचा नवा अध्याय रचण्यास आपण इच्छुक असल्याचंही नवले यांनी या पोस्टमधून स्पष्ट केलं आहे.
आपल्या कारेगाव कान्हूरमेसाई गणाच्या सर्वांगीण विकासासाठी आणि जनतेच्या सेवेसाठी मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने पंचायत समिती निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्याची घोषणा सरपंच मॅडमने केली आहे.
निर्मला नवले यांनी यावेळी माजी गृहमंत्री दिलीपरावजी वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मला पक्षाची अधिकृत उमेदवारी मिळेल, असा विश्वासही व्यक्त केला आहे. त्यांनी इन्स्टाग्राम पोस्टमध्ये '' आपला विश्वास, माझा निर्धार आता फक्त विकास," असं म्हटलं आहे.
कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांनी पंचायत समिती निवडणुकीसाठी दंड थोपटल्याचे दिसून येत आहे. मात्र, अजित पवार सरपंच निर्मला नवले यांना राष्ट्रवादी काँग्रेसची उमेदवारी देणार की वेटिंगवर ठेवणार हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
पुणे जिल्ह्यातील कारेगावच्या सरपंच निर्मला नवले यांची सध्या सोशल मीडियावर प्रचंड क्रेझ आहे. निर्मला नवले या अजित पवारांच्या राष्ट्रवादीमध्ये सक्रिय आहेत. तसेच त्या वेगवेगळ्या सामाजिक उपक्रम,कौटुंबिक कार्यक्रम यांसह स्वत:चे नवनवीन फोटो सोशल मीडियावर शेअर करत असतात. सोशल मीडियावर सरपंच मॅडमचा मोठा चाहता वर्ग आहे.
इन्स्टाग्रावर त्यांचे तब्बल 539K फॉलोअर्स आहेत. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी पक्षाकडून त्यांना मोठी जबाबदारी देण्यात आली आहे.काही महिन्यांपूर्वीच नवले यांना नवऱ्याकडून रेज रोव्हर ही आलिशान व महागडी कार गिफ्ट मिळाली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.