Ajit Pawar Dead: बारामती विमानतळावर विमान अपघातग्रस्त होऊन यामध्ये राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार गंभीर जखमी झाले होते. आता त्यांचा मृत्यू झाला असल्याची माहिती समोर आली आहे. अपघातग्रस्त विमानातील पाच प्रवाशांचा मृत्यू झाल्याची माहिती डीजीसीएने दिली आहे.
बारामती तालुका पंचायत समिती व जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्ताने अजित पवार हे आज बारामतीत सभा घेणार होते.त्यासाठी विमानाने ते नेहमीप्रमाणे बारामतीला येत होते. बारामती विमानतळावर विमान उतरविण्याचा प्रयत्न अयशस्वी ठरल्याने हे विमान आदळल्याने त्या विमानाला आग लागली, असे प्रथमदर्शनी समजते आहे.
या अपघातामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार हे देखील गंभीर जखमी झाल्याचा प्राथमिक अंदाज असून पोलीस व मदत यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली आहे.
हा अपघात नेमका कशामुळे झाला याची माहिती मिळत नाही, मात्र वैमानिकाला धावपट्टीचा अंदाज न आल्यामुळे हा अपघात झाला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
या घटनेमुळे बारामती परिसरात खळबळ माजली असून बारामतीकरांनी अपघात ग्रस्त ठिकाणाकडे धाव घेतली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने या ठिकाणी येत असून अजित पवार यांची तब्येत कशी आहे हे जाणून घेण्यासाठी सर्वांची धडपड सुरू आहे या घटनेने बारामतीकरांना कमालीसा धक्का बसला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.