Bajrang Sonawane addressing the media while raising questions and demanding a transparent probe into the Ajit Pawar plane crash incident in Maharashtra. Sarkarnama
पुणे

Bajrang Sonawane : अजितदादांच्या अपघातावर बजरंग सोनवणेंचा संशय कायम; म्हणाले, 'त्या दिवशी पीए...'

Ajit Pawar Plane Crash : अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत बजरंग सोनवणे यांनी नवे संशय व्यक्त करत पारदर्शक चौकशीची मागणी केली असून संसद व मुख्यमंत्री भेटीचे संकेत दिले आहेत.

Sudesh Mitkar

Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अजूनही काही प्रश्न अनुत्तरित आहेत. त्यामुळे वेगवेगळे तर्कवितर्क समोर येत आहेत. अशातच बीडचे खासदार बजरंग सोनवणे यांच्याकडून सातत्याने वेगवेगळ्या शंका उपस्थित केल्या जात आहेत.

यापूर्वी खासदार बजरंग सोनवणे यांनी या अपघाताचा अधिक पारदर्शक तपास झाला पाहिजे. अशी मागणी करत विमानात सहा जण प्रवास करत होते, तर पाच मृतदेहच कसे सापडले? तसेच विमानात स्फोटक किंवा बॉम्ब नव्हता ना ? याचाही तपास झाला पाहिजे, अशी मागणी केली होती. आता त्यांनी वेगळची शंका उपस्थित केली आहे.

माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, विमान अपघाताबाबत मी कोणीही आरोप करत नाही सर्व शंका व्यक्त करत आहेत. कारण अपघातापूर्वीचा तसा घटनाक्रम आहे. हा अपघात झाला तेव्हा अजित पवारांसोबत पीए का नव्हता? नेहमी सोबत असणारे पीए कुठे गेले होते? त्यादिवशी फक्त गार्ड सोबत का होते? असा नवा प्रश्न सोनवणे (Bajrang Sonawane) यांनी उपस्थित केला आहे.

ते पुढे म्हणाले, मी फक्त संशय व्यक्त केलेला आहे. याबाबत मी संसदेत प्रश्न उपस्थित करणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची देखील भेटणार आहे. सर्व प्रकरणाची चौकशी योग्य पद्धतीने केले जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहे माझा त्यावर विश्वास आहे, असं देखील सोनवणे म्हणाले.

पवारसाहेबा निर्णय घेतील...

अजित पवार यांच्या रुपाने देशाचे, महाराष्ट्राचे नेतृत्व हरवलं आहे. तळागाळातील प्रत्येक प्रश्नाची उकल अजित पवार यांना होती. सध्या राष्ट्रवादींच्या विलीनीकरणाबाबत ज्या चर्चा सुरू आहेत. त्या बाबत निर्णयाचा अधिकार हा शरद पवार साहेबांचा आहे. तो त्यांचा घरचा विषय आहे ते एकत्रित निर्णय घेतील, असे देखील त्यांनी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT