MLC Election : उद्धव ठाकरेंसह विधानपरिषदेतील नऊ जणांच्या आमदारकीचा कार्यकाळ संपतोय; महायुती, मविआमध्ये सत्तेच्या समीकरणाचा 'खेळ' सुरू

Maharashtra Legislative Council election News : विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार सध्या महायुतीकडे बहुमत आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मिळून 235 संख्याबळ आहे.
Sharad Pawar, Uddhav Thackeray
Sharad Pawar, Uddhav ThackeraySarkarnama
Published on
Updated on

Mumbai News : राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या विधान परिषद सदस्यत्वाचा कार्यकाळ 13 मे 2026 रोजी संपणार आहे. ठाकरे यांच्या सोबतच राज्यातील 9 आमदारांचा कार्यकाळ संपत आहे. विधानसभेतील पक्षीय बलाबलानुसार सध्या महायुतीकडे बहुमत आहे. भाजप, एकनाथ शिंदे यांची शिवसेना व अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडे मिळून 235 संख्याबळ आहे.

त्यामुळे महायुतीचे सात आमदार सहज निवडून येऊ शकतात तर महाविकास आघाडीचे एकत्रित संख्याबळ पहिले तर एक सदस्य सहज निवडून येतो तर दुसऱ्या जागेसाठी मित्रपक्षाची मदत लागणार आहे. त्यामुळे आता महाविकास आघाडीकडे पुरेसे संख्याबळ नसल्याने विधान परिषदेची निवडणूक उद्धव ठाकरे पुन्हा लढणार का? असा पेच झाला आहे. त्या पार्श्वभूमीवर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.

विधान परिषदेची निवडणूक होण्यापूर्वीच 2 एप्रिलला माजी केंद्रीय मंत्री व ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यासह राज्यातील सहा राज्यसभेचे खासदार निवृत्त होत आहेत. त्यासाठी देखील महाविकास आघाडीकडे एकच सदस्य निवडून येईल इतके संख्याबळ आहे. त्यामुळे येत्या काळात महाविकास आघाडीमधील काँग्रेस, उद्धव ठाकरेंची शिवसेना व शरद पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस यांना तडजोड करावी लागणार आहे. त्यामुळे सर्वांचे त्याकडे लक्ष लागले आहे.

राज्यसभेतून शरद पवार (Sharad Pawar) यांच्यासह उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या प्रियंका चतुर्वेदी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या फौझिया खान, काँग्रेसच्या रजनी पाटील तर महायुतीचे रामदास आठवले, भागवत कराड, धैर्यशील पाटील यांची मुदत संपत आहे. याठिकाणी महायुतीचे पाच तर महाविकास आघाडीचा एक सदस्य निवडून येऊ शकतो.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
BJP Mumbai Mayor : उद्धव ठाकरेंनी भाजपचा पैरा फेडला; मुंबईच्या महापौर निवडणुकीत माघार, रितू तावडेंचा बिनविरोध विजय निश्चित

विधान परिषदेतून उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यासह 13 मे 2026 रोजी निवृत्त होणारे दिग्गज नेत्यांमध्ये एकनाथ शिंदे यांच्या शिवसनेच्या नीलम गोऱ्हे, अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे अमोल मिटकरी, शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे शशिकांत शिंदे, भाजपचे रणजितसिंह मोहिते-पाटील, संजय केणेकर, संदीप जोशी, दादाराव केचे व काँग्रेसचे राजेश राठोड हे निवृत्त होत आहेत.

आमदार रमेश कराड, प्रवीण दटके व गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून गेल्याने त्यांच्या विधानपरिषदेतील जागा रिक्त झाल्या होत्या. संजय केणेकर हे रमेश कराड यांच्या जागी निवडून आले. तर संदीप जोशी हे प्रवीण दटके यांच्या जागी तर दादाराव केचे हे गोपीचंद पडळकर यांच्या जागी निवडून आले होते.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Shivsena News : एकनाथ शिंदेंनी उपमहापौरपदासाठी दिलेल्या उमेदवाराला संजय शिरसाट यांचा विरोध? दुसरा उमेदवार देताच शिवसेना सचिवांचे तातडीने पत्र

विधानपरिषदेसाठी जर निवडणूक झाली तर एका उमेदवाराला निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची किमान 29 मते आवश्यक आहेत. त्यानुसार भाजपकडे 132 आमदार आहेत. चार आमदार निवडून येऊ शकतात, तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे 57 आमदार आहेत त्यामुळे दोन आमदार निवडून येऊ शकतात तर अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे 41 आमदार आहेत त्यामुळे एक आमदार सहज निवडून येऊ शकतो. भाजप व राष्ट्र्वादीतील काही शिल्लक मते व महाविकास आघाडीकडील शिल्लक मते यावर ऐनवेळी अपक्ष व छोट्या पक्षाची मते मिळतील त्याचा एक उमेदवार निवडून येऊ शकतो. त्यामुळे महायुतीचे सात आमदार सहज निवडून येऊ शकतात.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
NCP Merger : दोन्ही राष्ट्रवादी विलिनीकरणाबाबत अजितदादांच्या निकटवर्तीयाचा मोठा दावा; ‘होय आमच्यासमोर बोलणं झालं होतं...’

महाविकास आघाडीचे एकत्रित तीन पक्ष मिळून संख्याबळ 46 आमदार इतके आहे. त्यामुळे एक सदस्य सहज निवडून येऊ शकतो तर दुसऱ्या जागेसाठी 12 आमदारांची गरज भासणार आहे. तर महायुतीने ताकद लावली तर त्यांची आठवी जागा निवडून येऊ शकते. मात्र, त्यांनाही पाच ते सहा मतांची गरज आहे. सध्या सभागृहातील अजित पवार यांच्या निधनामुळे राष्ट्रवादीची एक तर भाजप आमदार शिवाजी कर्डीले यांच्या निधनामुळे एक अशा एकूण दोन जागा रिक्त आहेत.

येत्या काळात आघाडीतील पक्षांनी एकमेकांना मदत केल्यास काही जागा निवडून येतील. उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने राज्यसभा निवडणुकीत काँग्रेस किंवा शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला पाठिंबा दिल्यास उद्धव ठाकरेंचा विधान परिषदेचा मार्ग सुकर होऊ शकतो. या सर्व घडामोडींवर आता उद्धव ठाकरे काय निर्णय घेतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Congress Alert : राष्ट्रवादीच्या विलीनीकरणाच्या चर्चा, काँग्रेसने उचललं मोठं पाऊल; कार्यकर्त्यांना स्पष्ट सांगितले,...

आगामी काळात होत असलेल्या राज्यसभा आणि विधानपरिषद निवडणुकांसाठी महाविकास आघाडीला मित्रपक्षांच्या मदतीची गरज भासणार आहे. यावर भाष्य करताना संजय राऊत म्हणाले, 'आम्ही उद्धव ठाकरे यांना विनंती केलेली आहे. त्यांनी राज्याचे मुख्यमंत्री म्हणून काम केले आहे. त्या विधीमंडळामध्ये पुन्हा जाणे हे राज्यासाठी आणि जनतेसाठी आवश्यक असल्याचे राऊत यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar, Uddhav Thackeray
Shivsena News : एकनाथ शिंदेंनी उपमहापौरपदासाठी दिलेल्या उमेदवाराला संजय शिरसाट यांचा विरोध? दुसरा उमेदवार देताच शिवसेना सचिवांचे तातडीने पत्र

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com