Sunil Shelke NCP : भाजपच्या सत्तेला अजितदादांचा शिलेदार लावणार सुरुंग! जिल्हा परिषद निवडणुकीत इतिहास बदलणार?
Pune News : पुणे जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकांसाठीचे मतदान पार पडले आहे. आता सोमवारी (ता.09) निवडणूक निकालाची सर्वच प्रतीक्षा करत आहेत. एकीकडे एक्झिट पोल मध्ये पुणे जिल्ह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा करिष्मा दिसणार असल्याचे सांगितलं जात असताना मावळमध्ये मात्र काट्याची टक्कर पाहायला मिळत आहेत.
मावळात भाजप विरुद्ध राष्ट्रवादी काँग्रेस थेट सामना पाहायला मिळत आहे. गेले वीस वर्ष सलग मावळ पंचायत समितीवर भाजपची सत्ता राहिली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा मावळावर झेंडा फडकवण्यासाठी भाजपने कंबर कसली आहे. तर दुसरीकडे सलग दोन विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला पराभवाचा धक्का देणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील शेळके यांनी यंदा उलट फेर करण्याचा चंग बांधला आहे.
त्यामुळे आता मावळात कोण सत्ता गाजवणार याची उत्सुकता संपूर्ण मावळ वासियांना लागली असल्याचं पाहायला मिळत आहे. मावळ पंचायत समितीचा इतिहास पाहिल्यास 1992 मध्ये काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांमध्ये चुरशीची लढत झाली दोघांनाही समान जागा मिळाल्यानंतर चिठ्ठी उडवण्यात आली आणि या चिठ्ठी मध्ये भाजपाचा सभापती आणि उपसभापती झाला.
त्यावेळी सभापतिपदी भाजपचे एकनाथ तिळे व उपसभापतिपदी भाजपच्या रुपलेखा ढोरे यांना संधी मिळाली होती. त्या निमित्ताने भाजपची पहिल्यांदाच मावळमध्ये सत्ता आली. त्यानंतरच्या पाच वर्षात म्हणजे सन 1997 ते 2002 या काळात पुन्हा काँग्रेस-राष्ट्रवादीने सत्ता काबीज केली.
मात्र त्यानंतर 2002 मध्ये झालेल्या मावळ पंचायत समितीच्या निवडणुकांमध्ये भाजपने आपला झेंडा पुन्हा फडकवला आणि त्यानंतर सलग 20 वर्ष या ठिकाणी भाजपने निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केल्याचे पाहायला मिळालं. 2022 पर्यंत ठिकाणी भाजपची सत्ता राहिली त्यानंतर मागील चार वर्षात पंचायत समितीच्या निवडणुकांचा कारभार हा प्रशासकाच्या हाती राहिला त्यात काळातही पंचायत समितीवर भाजपाचाच वर चष्मा असल्याचे पाहायला मिळालं त्यामुळे आत्तापर्यंत जवळपास 24 वर्ष भाजप मावळ पंचायत समिती वर आपली भक्कम पकड बनून असल्याचे पाहायला मिळत आहे.
भाजपाच्या या कामगिरीमुळे मावळ हा अनेक वर्ष भाजपाचा गड बनला मात्र 2019 मध्ये भाजपामधून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये गेलेल्या सुनील शेळके यांनी आमदारकीची निवडणूक जिंकली त्यानंतर सलग दोन वेळा ते मावळ मधून निवडणूक जिंकले आहेत.
त्यामुळे आता कोणत्याही परिस्थितीत पंचायत समिती देखील हस्तगत करण्यासाठी शेळके यांनी जोर लावला आहे. तर भाजपनेही डावाला प्रतिडाव करत राष्ट्रवादीच्याच तालमीत तयार झालेल्या नेत्यांना उमेदवारी देऊन आव्हान उभे केले असून सत्ता कायम राखण्याचा प्रयत्न केला आहे. यापूर्वीच बलाबल पाहिल्यास जिल्हापरिषद : भाजप 2, राष्ट्रवादी 3 तर पंचायत समिती : भाजप 7, राष्ट्रवादी 3 असे राहिले आहे. सोमवारी (ता.9) निकालानंतर नेमका काय निकाल लागणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

