VSR company owner arrest demand : विमान दुर्घटनेत अजित पवार यांच्या मृत्युला महिना उलटल्यानंतर शनिवारी एएआयबीने अपघाताचा प्राथमिक अहवाल जाहीर केला. या अहवालामध्ये अपघाताआधी घडलेल्या घडामोडींचा संपूर्ण आढावा घेण्यात आला. हा अहवाल समोर आल्यानंतर अजित पवारांचे पुत्र जय पवार यांनी सोशल मीडियात पोस्ट करत त्यावर खेद व्यक्त केला आहे. तसेच एक व्हिडीओ पोस्ट करत खळबळ उडवून दिली आहे.
जय पवार यांनी काही मिनिटांपूर्वीच अहवालावर सोशल मीडियात आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी म्हटले आहे की, एआयबीने तपासलेला प्राथमिक अहवाल मी वाचला. हा अहवाल पूर्णपणे आणि सखोलपणे तयार न केल्याचे पाहून मला अत्यंत खेद आणि वेदना होत आहेत. महाराष्ट्रातील जनतेला तसेच या अपघातात आपल्या प्रियजनांना गमावलेल्या सर्व कुटुंबीयांना केवळ औपचारिक माहिती नव्हे, तर सत्य, पारदर्शक आणि सर्वंकष उत्तरे मिळालीच पाहिजेत, असे अपेक्षा जय पवारांनी व्यक्त केली आहे.
डीजीसीएने ज्या मुद्यांवर व्हीएसआर व्हेंचर्सची काही विमाने ग्राउंड केली आहेत, त्याच मुद्यांवर इतर विमानांमध्येही त्रुटी असण्याची शक्यता आपण नाकारू शकत नाही. जर सुरक्षेसंदर्भातील नियम आणि प्रक्रियांमध्ये गंभीर त्रुटी आढळल्या असतील, तर केवळ काही विमानांपुरती कारवाई न करता संपूर्ण व्हीएसआर फ्लीटबाबत कठोर निर्णय घेणे आवश्यक आहे. प्रवाशांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत, आवश्यक असल्यास व्हीएसआरच्या संपूर्ण विमान ताफ्याचे पूर्णपणे संचालन बंद करण्याचाही डीजीसीएने विचार करण्यात यावा, असेही जय पवारांनी म्हटले आहे.
या पोस्टनंतर जय पवार यांनी काही सेकंदाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. पोस्टमध्ये त्यांनी म्हटले आहे की, माझ्या वडिलांना आपण गमावले… ही वेदना आयुष्यभर साथ देणार आहे. या व्हिडिओमध्ये VSR चे मालक रोहित सिंह मुख्य पायलटच्या सीटवर उड्डाणादरम्यान झोपलेले दिसत आहेत. आकाशात असताना असा निष्काळजीपणा असू शकत नाही. हे अत्यंत गंभीर आणि धक्कादायक आहे.
मी DGCA ला ठामपणे मागणी करतो, या प्रकरणात तात्काळ कठोर कारवाई व्हावी. संपूर्ण चौकशी होईपर्यंत VSR ची सर्व विमाने तात्काळ ग्राउंड करण्यात यावीत आणि रोहित सिंह यांना त्वरित अटक करून कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी जय पवार यांनी केली आहे. ही एका मुलाची आर्त हाक आहे. माझ्या वडिलांसाठी आणि प्रत्येक प्रवाशाच्या सुरक्षिततेसाठी, अशी भावनिक सादही त्यांनी घातली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.