BJP Politics : भाजपची मोठी खेळी; मित्रपक्षाचे नामोनिशाण मिटविणार, राज्यसभा निवडणुकाआधी थेट विलीनीकरणाचा डाव

Upendra Kushwaha news : राज्यसभेत भाजपला स्वबळावर बहुमत नाही. त्यासाठी भाजपकडून विविध राज्यांमध्ये ताकद वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत.
Narendra Modi, Amit Shah
Narendra Modi, Amit ShahSarkarnama
Published on
Updated on

Rajya Sabha election strategy : बिहार विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच सर्वात मोठा पक्ष होण्याचा मान मिळविणाऱ्या भाजपचा आत्मविश्वास चांगलाच दुणावला आहे. राज्यात आपली ताकद आणखी वाढविण्यासाठी भाजपने आता मोठी खेळी खेळली असल्याची चर्चा आहे. राज्यसभा निवडणुकीची चर्चा सुरू असतानाच भाजपने आपल्या मित्रपक्षाला थेट विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याने राज्याच्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

भाजपने राष्ट्रीय लोकमोर्चा पक्षाला विलीनीकरणाचा प्रस्ताव दिल्याचे समोर आले आहे. या प्रस्तावाला आता राज्यसभा निवडणुकीशी जोडले जात आहे. पक्षाचे प्रमुख उपेंद्र कुशवाह  सध्या राज्यसभेचे सदस्य आहे. मात्र, त्यांचा कार्यकाळ संपत असल्याने बिहारमध्ये १६ मार्चला निवडणूक होणार आहे. पुन्हा राज्यसभेत पोहोचण्यासाठी कुशवाह यांना भाजप किंवा संयुक्त जनता दलाच्या मतांशिवाय दुसरा पर्याय नाही.

कुशवाह यांच्याकडून भाजपच्या कोट्यातून उमेदवारी मिळण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. दुसरीकडे लोक जनशक्ती पक्षाचे (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनीही आपल्या पक्षाला उमदेवारी मिळावी, यासाठी दबाव वाढविल्याचे सांगितले जात आहे. त्यामुशे कुशवाह यांचे टेन्शन वाढले आहे. त्यांच्या पक्षाचे भाजपमध्ये विलीनीकरण झाल्यास त्यांचा राज्यसभेचा मार्ग मोकळा होईल, अशी चर्चा आहे.

Narendra Modi, Amit Shah
Ajit Pawar plane crash : अजितदादांच्या विमानाच्या अपघाताची दोनच प्रमुख कारणे?अहवालामधून मिळाले स्पष्ट संकेत...

राज्यसभेत भाजपला स्वबळावर बहुमत नाही. त्यासाठी भाजपकडून विविध राज्यांमध्ये ताकद वाढविण्याचे प्रयत्न केले जात आहेत. बिहारमध्ये कुशवाह यांचा पक्ष भाजपमध्ये आल्यास एका दगडात दोन पक्षी मारण्याची रणनीती यशस्वी होऊ शकते. भाजपचे राज्यसभेतील संख्याबळ वाढण्यासोबतच बिहारमधील कुशवाह यांच्याशी संबंधित समाज थेट भाजपशी जोडला जाईल.

दरम्यान, कुशवाह यांनी काही वर्षांपूर्वी संयुक्त जनता दलालाल सोडचिठ्ठी देताना आपण आघाडी करू पण भाजपमध्ये प्रवेश करणार नाही, असे स्पष्टपणे सांगितल होते. त्यामुळे कुशवाह यांच्या भूमिकेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कुशवाह यांनी विलीनकरणाचा प्रस्ताव मान्य केल्यास विरोधकांकडून टीकेचे धनी होऊ शकतात. प्रस्ताव मान्य न केल्यास राज्यसभेची जागा धोक्यात येईल. त्यामुळे त्यांच्यावरील दबाव वाढला आहे.

Narendra Modi, Amit Shah
Rajya Sabha Election : संसदेत इतिहास घडणार; राज्यसभेत निवडून जाणार पहिला समलिंगी खासदार, 'या' महिलेला उमेदवारी जाहीर...

कुशवाह यांचे पुत्र बिहार सरकारमध्ये मंत्री आहेत. तर पत्नीही आमदार आहे. आमदारही नसलेल्या मुलाला मंत्री केल्याने आधीच पक्षांतर्गत नाराजी आहे. काही नेत्यांनी पक्षाला सोडचिठ्ठीही दिली आहे. यापार्श्वभूमीवर राज्यसभेची उमेदवारी न मिळाल्यास कुशवाह यांची राजकीय ताकद कमी होऊ शकते. त्यामुळे राज्यसभा निवडणुकीला महत्व प्राप्त झाले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com