Ajit Pawar Sarkarnama
पुणे

GBS patients Pune : पुण्यातील गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांना अजितदादांचा दिलासा! प्रजासत्ताकदिनी केली 'ही' मोठी घोषणा

Free GBS treatment Pune : पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून गुलेन बॅरी सिंड्रोमच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या 73 वरती पोहोचली आहे. तर या आजाराची लागण झाल्यामुळे रविवारी पुण्यात एका रूग्णाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

Jagdish Patil

Pune News, 26 Jan : पुण्यासह पिंपरी-चिंचवड शहरात मागील काही दिवसांपासून गुलेन बॅरी सिंड्रोमच्या (Guillain Barre Syndrome) रुग्णांची संख्या वाढत आहे. जिल्ह्यातील रुग्णसंख्या 73 वरती पोहोचली आहे. तर या आजाराची लागण झाल्याने रविवारी एका रूग्णाचा मृत्यू झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.

याच सर्व पार्श्वभूमीवर प्रशासन अलर्ट झालं आहे. एकीकडे या आजारामुळे शारीरिक आणि मानसिक त्रास रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना सहन लागत आहे. तर दुसरीकडे आजाराच्या उपचारासाठी मोठा खर्च येत आहे. यामुळे अनेक पुणेकर (Pune) काळजीत आहेत.

मात्र, आता याच काळजीत असलेल्या पुणेकरांना उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) मोठा दिलासा दिला आहे. कारण, बॅरी सिंड्रोमच्या या आजारावर मोफत उपचार करण्यात यावेत अशी मागणी पुणेकरांकडून करण्यात येत होती. पुणेकरांची ही मागणी आता प्रशासनाने मान्य केल्याची घोषणा अजितदादांनी पुण्यात केली आहे. त्यामुळे आता जीबीएसच्या रुग्णांवर पुण्यात मोफत उपचार होणार आहेत.

पुणे महानगर पालिकेच्या कमला नेहरू रुग्णालयात मोफत उपचार केले जाणार आहेत. वाढती रुग्णसंख्या पाहता प्रशासनाकडून जीबीएस आजारावरील उपचारासाठी सर्व उपाययोजना करण्यात येत आहेत. तर नागरिकांनी कोणत्याही अफवेवर विश्वास ठेवू नये आणि घाबरून जावू नये.

फक्त स्वत:ची योग्य काळजी घ्यावी, असं आवाहन देखील प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. दरम्यान, असून महापालिका आयुक्त सर्व आरोग्य विभागाची आज तातडीची बैठक घेणार आहेत. ज्या खासगी रुग्णालयात GBS चे रुग्ण आहेत त्यांच्याकडून किती बिल घेतलं जात आहे यावर देखील लक्ष ठेवले जाणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT