Mahayuti Politics : 'मी गरीब असल्यानं गरीब जिल्ह्याचं पालकत्व दिलं...' म्हणत अजितदादांच्या नेत्याने व्यक्त केली खंत

Mahayuti internal conflict : महायुतीती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेत्यांमधील नाराजीचं सत्र पालकमंत्रिपदावरुनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला होता.
Ajit Pawar
Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Hingoli News, 26 Jan : महायुतीती (Mahayuti) सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारानंतर नेत्यांमधील नाराजीचं सत्र पालकमंत्रिपदावरुनही कायम असल्याचं पाहायला मिळत आहे. रायगड आणि नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदावरुन महायुतीतील वाद चव्हाट्यावर आला होता.

अशातच आता उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या (Ajit Pawar) राष्ट्रवादीचे नेते नरहळी झिरवळ यांनी थेट आपण गरीब असल्याने गरीब जिल्ह्याचं पालकत्व दिल्याची खंत व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे त्यांना ज्या जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे ती त्यावर ते समाधानी नसल्याचं दिसत आहे.

महायुती सरकारच्या मंत्रिमंडळ विस्तारापासून पालकमंत्र्यांची निवड कधी होणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. अखेर सरकारने राज्यातील पालकमंत्र्यांची यादी जाहीर केली. मात्र, या यादीत अनेक नेत्यांना होमटाऊन सोडून इतर जिल्ह्याचं पालकमंत्रिपद दिल्यामुळे अनेकांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे.

Ajit Pawar
Arvind Kejriwal : दिल्ली विधानसभा निवडणूक केजरीवालांसाठी अस्तित्वाचीच लढाई! बदललेल्या प्रतिमेचा बसेल फटका?

अशातच आता राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते नरहरी झिरवळ (Narhari zirwal) यांनी देखील हिंगोली जिल्ह्याचं पालकमंत्रिपद मिळाल्यावरून नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी थेट मी गरीब असल्यानं मला गरीब जिल्ह्याचं पालकत्व दिल्याचं वक्तव्य केलं आहे. पालकमंत्रिपदाबाबत माध्यमांशी बोलताना त्यांनी आपली खदखद व्यक्त केली आहे.

ते म्हणाले, "मला या जिल्ह्याचं पालकमंत्रिपद दिल्यामुळे मला आनंद झालाय की, आम्ही एवढे गरीब आहोत की हा अल्प किंवा जिथं एमआयडीसी नाही अशा राज्यातील जिल्ह्याचं नाव सांगा तर ते होतं हिंगोली. आता इथे थोड्याफार प्रमाणात MIDC यायला सुरूवात झाली आहे. एवढं ऐकल्यानंतर मी सांगितलं की बाबा हे अल्प आहे, गरीब आहे.

पाण्यापासून वंचित आहे, अशा ठिकाणी माझ्यासारख्या गरीबाची नियुक्ती केली म्हणजे नेमकं काय? असं मी शासनाला विचारणार आहे", असं म्हणत त्यांनी आपल्या मनातील खदखद व्यक्त केली आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे महायुतीतील नेत्यांची मिळालेल्या पालकमंत्रिपदावरील नाराजी कायम असल्याचं दिसत आहे.

Ajit Pawar
Congress on Election Commission : ''निवडणूक आयोग जिवंत आहे का, जर असेल तर...'' ; काँग्रेसचे पुन्हा एकदा जोरदार टीकास्त्र!

तर दुसरीकडे नाशिक आणि रायगडमधील पालकमंत्र्यांची निवड रद्द करण्यात आली आहे. याबाबतचा शासन निर्णय जाहीर करण्यात आला आहे. रायगडच्या पालकमंत्रिपदी अदिती तटकरे तर नाशिकच्या पालकमंत्रिपदी गिरीश महाजन (Girish Mahajan) यांची नियुक्ती करण्यात आली होती. मात्र काही तासांनंतरच या दोघांची नियुक्ती रद्द करण्यात आली. दोन्ही ठिकाणी शिंदेंच्या शिवसेनेच्या नेत्यांनी पालकमंत्र्यांच्या नियुक्तीवर आक्षेप घेतला आहे.

नाशिकचे पालकमंत्रिपद भाजपने घेऊन तिथे गिरीश महाजनांची नियुक्ती केल्याने शिवसेनेचे दादा भुसे नाराज होते. तर रायगडच्या पालकमंत्रिपदावर शिंदेसेनेने दावा केला होता. आमदार भरत गोगावले यांना रायगडचे पालकमंत्रिपद हवे होते, पण जिल्ह्यात अजित पवार गटाचा एकच आमदार असतानाही पालकमंत्रिपद अदिती तटकरेंना देण्यात आले होते. त्यामुळे शिवसेना शिंदे गट आक्रमक झाली होती.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com