Ajit Pawar  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar PC : पुणे पोलिसांना अजितदादांनी जाहीररित्या फटकारले; ‘तुम्हाला जमत नसेल तर पद सोडा...’

Pune Police News : राजकीय हस्तक्षेप नसेल तर पोलिसांना काम करण्यात अडचण येत नाहीत. पुण्यात अजिबात राजकीय हस्तक्षेप होत नाही, तर मग गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे.

Vijaykumar Dudhale

Pune, 09 January : पुण्यातील वाढत्या गुन्हेगारीच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कामावर तीव्र शब्दांत नापसंती व्यक्त केली आहे. वरिष्ठ पोलिस आधिकाऱ्यांना पुण्यातील गुन्हेगारीला पायबंद घालता येत नसेल तर त्यांनी काम सोडावे, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या कार्यपद्धतीवर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

महापालिकेचे अधिकारी आणि पोलिस प्रशासनाची उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी आज पुण्यात बैठक घेतली. त्या बैठकीनंतर माध्यमांशी बोलताना पुण्यातील कोयता गॅंग आणि इतर वाढत्या गुन्हेगारी घटनांच्या प्रश्नाला उत्तर देताना अजितदादांनी पुणे पोलिसांच्या कामावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

राजकीय हस्तक्षेप नसेल तर पोलिसांना काम करण्यात अडचण येत नाहीत. पुण्यात अजिबात राजकीय हस्तक्षेप होत नाही, तर मग गुन्हेगारी रोखण्याची जबाबदारी पोलिसांची आहे. पोलिस कमी पडत आहेत. वरिष्ठ पोलिस आधिकाऱ्यांना जमत नसेल तर त्यांनी काम सोडावे. आम्ही दुसरे आधिकारी आणू, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री ⁠अजित पवार यांनी पुणे पोलिसांच्या (Pune Police) कामावर जाहीरपणे नाराजी व्यक्त केली.

पीएमपीच्या ताफ्यात टाटाच्या २०० नवीन बस घेण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला आहे. माध्यमांशी बोलण्यासाठी मी बैठका थांबवून आलो आहे. मी परत जाणार आहे. त्यात पुण्यातील गुन्हेगारीवर चर्चा करणार आहे, असेही अजित पवार यांनी स्पष्ट केले.

दरम्यान, शिरूर तालुक्यातील घोडगंगा सहकारी साखर कारखाना आणि हवेली तालुक्यातील यशवंत सहकारी साखर कारखाना सुरू करण्यासंदर्भात बैठक घेण्यात आली आहे. साखर कारखान्यात राजकारणात न करता हे बंद पडलेले साखर कारखाना सुरू करण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असेही पवार यांनी स्पष्ट केले.

राज्यात पुन्हा एकदा महायुतीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये इनकमिंग वाढले आहे. त्या पार्श्वभूमीवर पुण्यातही अजित पवार यांच्या उपस्थितीत काही प्रवेश झाले, त्याबाबत खुद्द अजित पवार यांनीस सांगितले. ते म्हणाले, राजगड (वेल्हे) आणि हवेली तालुक्यातील अनेक सरपंच, कार्यकर्ते यांनी आज आमच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT