Delhi Assembly Election : ‘आप’च्या विजयाची भविष्यवाणी करणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांवर काँग्रेस नेत्याचा पलटवार; ‘त्यांनी काँग्रेस सोडावी अन्‌ ..’

Prithviraj Chavan Vs Sandeep Dixit : दिल्ली विधानसभेची निवडणूक महत्वाची असणार आहे. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष जिंकेल, असा दावा चव्हाण यांनी केला.
Arvind Kejriwal -SandeepDixit -Prithviraj Chavan
Arvind Kejriwal -SandeepDixit -Prithviraj Chavan Sarkarnama
Published on
Updated on

New Delhi, 09 January : दिल्ली विधानसभा निवडणुकीत दिवसेंदिवस रंगत येताना दिसत आहे. देशपातळीवर इंडिया आघाडीत एकत्र असणारे काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हे दोन्ही पक्ष दिल्ली विधानसभा निवडणुकीत आमने सामने आले आहेत. स्थानिक काँग्रेस नेते आणि आपचे नेते एकमेकांवर मोठ्या प्रमाणात टीका करत असताना काँग्रेसचे बडे नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी केलेल्या विधानाचा दिल्लीचे काँग्रेस नेते संदीप दीक्षित यांनी खरपूस शब्दांत समाचार घेताना त्यांना एक अजब सल्ला दिला आहे.

दिल्लीत आम आदमी पक्ष (AAP)), काँग्रेस आणि भाजप अशी तिरंगी लढत होत आहे. इंडिया आघाडीत एकत्र असणारे काँग्रेस आणि आम आदमी पार्टी हो दोन्ही पक्ष आघाडीच्या माध्यमातून निवडणूक लढवतील, असे काही ज्येष्ठ नेत्यांना वाटत होते. मात्र, इंडिया आघाडीतील काँग्रेस आणि आप हे दोन्ही पक्ष स्वबळावर निवडणुकीच्या मैदानात उतरले आहेत. काँग्रेस नेते अजय माकन यांनी अरविंद केजरीवाल यांना देशद्रोही म्हटलं होतं, त्यानंतर दोन्ही पक्षांत जोरदार वाक्‌युद्ध रंगले आहे.

दरम्यान, काँग्रेसचे वरिष्ठ नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan ) यांनी दिल्ली विधानसभा निवडणुकीसंदर्भात भाष्य केले आहे. दिल्ली विधानसभेची निवडणूक महत्वाची असणार आहे. या निवडणुकीत अरविंद केजरीवाल यांचा आम आदमी पक्ष जिंकेल, असा दावा चव्हाण यांनी केला. तसेच, काँग्रेस पक्षही निवडणुकीच्या रिंगणात आहे, असेही म्हटले होते.

दिल्ली विधानसभेसाठी काँग्रेस आणि आम आदमी पक्षाची आघाडी झाली असती तर चांगले झाले असते. मात्र, ही आघाडी होताना दिसत नाही. महाराष्ट्रात बसून मी दिल्ली विधानसभेाबबत बोलणे योग्य होणार नाही, असेही मत त्यांनी नोंदविले होते.

Arvind Kejriwal -SandeepDixit -Prithviraj Chavan
NCP Politics : भुजबळांची नाराजी स्वाभाविक, पण मी शंभर टक्के मंत्री होणार; राष्ट्रवादीच्या नेत्याचा कॉन्फिडन्स

पृथ्वीराज चव्हाण यांच्या वक्तव्यामुळे दुखावलेल्या संदीप दीक्षित यांनी त्यांना जोरदार उत्तर दिले आहे. ते म्हणाले, पृथ्वीराज चव्हाण हे काँग्रेसचे मोठे नेते आहेत. काही वर्षे ते दिल्लीत राहिले आहेत. काँग्रेस पक्षापेक्षा अरविंद केजरीवाल यांनी चांगले काम केले आहे, असे त्यांना वाटत असेल तर चव्हाण यांनी केजरीवाल यांच्या पार्टीत प्रवेश केला पाहिजे.

पृथ्वीराज चव्हाण वरिष्ठ नेते असतील पण, त्यांना कोणत्या गोष्टींची माहिती नसेल तर या वरिष्ठ नेत्यांनी अशी विधाने करून आपल्या अज्ञानाचे प्रदर्शन करू नये. काँग्रेस पक्षाला समर्थन मिळू नये, असे त्यांना वाटत असेल तर अशा व्यक्तींनी काँग्रेस पक्ष सोडून आम आदमी पक्षात प्रवेश केला पाहिजे, असा टोलाही संदीप दीक्षित यांनी चव्हाणांना लगावला.

संदीप दीक्षित म्हणाले, आम आदमी पक्षासोबत देशपातळीवर लोकसभा निवडणुकीच्या बाबत आघाडी झालेली आहे. राज्यात कोणीही आघाडी नव्हती. दिल्लीत काँग्रेस ताकदीने लढली आणि सरकार बनविले तर आणखी एका राज्यात काँग्रेस पक्ष सत्तेत येऊ शकते, अशी भीती या पक्षांना वाटत असेल.

Arvind Kejriwal -SandeepDixit -Prithviraj Chavan
Babanrao Shinde : विधानसभेला घड्याळाची उमेदवारी नाकारणारे बबनराव शिंदे म्हणतात ‘मी अजितदादांसोबत...’

दीक्षित विरुद्ध केजरीवाल सामना

माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांचे सुपुत्र असलेले संदीप दीक्षित हे दिल्ली काँग्रेसमधील बडे नेते मानले जातात. ते नवी दिल्ली विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांचा सामना माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्याशी होत आहे. मागील निवडणुकीत केजरीवाल यांनी या मतदारसंघातून विजय संपादन केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com