Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Ajit Pawar Baramati : बारामती राखण्यासाठी अजितदादांची मोठी तयारी; विधानसभेचं रणशिंग फुंकणार?

Baramati Assembly Constituency : लोकसभा निवडणुकीनंतर शरद पवार बारामती पिंजून काढत असताना अजितदादा मात्र मतदारसंघापासून दूर होते.

Sunil Balasaheb Dhumal

Baramati Political News : लोकसभा निवडणुकीत राष्ट्रवादीला (अजित पवार गट) फक्त एका जागेवर समाधान मानावे लागले. आता विधानसभेत बारामती हा आपला बालेकिल्ला राखण्यासाठीही उपमुख्यमंत्री अजित पवारांना विशेष प्रयत्न करावे लागणार असल्याचे बोलले जात आहे. यातूनच बारामतीत राष्ट्रवादी जनसन्मान महामेळाव्याचे आयोजन केले आहे. या मेळाव्यातूनच अजितदादा विधानसभेचे रणशिंग फुंकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

लोकसभेत बारामतीसह राज्यात 80 टक्के स्ट्राईक रेटने विजय मिळवल्यानंतर ज्येष्ठ नेते शरद पवारांनी Sharad Pawar बारामतीचा दौरा केला. बारामतीत सलग तीन दिवस मतदारांशी संवाद साधला. तसेच विविध मुद्द्यांवर बैठका, मेळावे घेतले. या सर्व कार्यक्रमांत त्यांच्यासोबत असणाऱ्या युगेंद्र पवारांनी Yugendra Pawar राजकीय वर्तुळाचे लक्ष वेधले आहे.

एकीकडे शरद पवार बारामती Baramati पिंजून काढत असताना अजितदादा मात्र मतदारसंघापासून दूर होते. आता मधल्या काळातील ही कसर भरून काढण्यासाठी बारामतीत अजित पवारांचा जनसन्मान महामेळावा होत असल्याची चर्चा आहे.

या मेळाव्यानिमित्त पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष खासदार प्रफुल्ल पटेल, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, ज्येष्ठ नेते छगन भुजबळ, दिलीप वळसे पाटील, हसन मुश्रीफ, धनंजय मुंडे यांच्यासह राज्यातील अनेक प्रमुख नेते बारामतीत तळ ठोकून असणार आहेत. त्यामुळे या मेळाव्यातून अजित पवार विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकण्याची शक्यता आहे. या मेळाव्यात अजित पवार कुणावर निशाणा साधणार, याकडे आता बारामतीकरांसह राज्याचे लक्ष आहे.

लोकसभा निवडणुकीत बारामतीत खासदार सुप्रिया सुळे यांचा विजय अजित पवारांच्या Ajit Pawar जिव्हारी लागला आहे. त्यामुळेच घोषणेपूर्वीच विधानसभा निवडणुकीसाठी अजित पवारांच्या पक्षाने आतापासूनच कंबर कसली आहे. पक्षाचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी पहिल्या टप्प्यात जिल्ह्यानुसार दौरा केला. तर आता दुसऱ्या टप्प्यात बारामतीतच जनसन्मान महामेळावा घेण्यात येत आहे. यावेळी राज्यातील अनेक प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. परिणामी लोकसभेनंतर अजित पवारांनी बारामतीवर विशेष लक्ष दिल्याची चर्चा सुरू आहे.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT