Ajit Pawar-Laxman Hake Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : बारामती बँके संदर्भात लक्ष्मण हाकेंनी केलेल्या 'त्या' आरोपांना अजितदादांचं चोख प्रत्युत्तर; म्हणाले, 'त्यांना अर्धवट...'

Ajit Pawar on Baramati Bank Loan Allegations : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी बारामती येथील ओबीसी मोर्चामध्ये बोलताना बारामती बँकेमध्ये मराठा समाजाची अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्ज मंजूर होतात आणि ठराविक लोकांनाच कर्ज दिलं जातं, असा आरोप केला होता.

Jagdish Patil

Baramati News, 28 Sep : ओबीसी आंदोलक लक्ष्मण हाके यांनी बारामती येथील ओबीसी मोर्चामध्ये बोलताना बारामती बँकेमध्ये मराठा समाजाची अण्णासाहेब महामंडळाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कर्ज मंजूर होतात आणि ठराविक लोकांनाच कर्ज दिलं जातं, असा आरोप केला होता.

हाकेंच्या याच आरोपांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी बारामती सहकारी बँकेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेतून चोख प्रत्युत्तर दिलं आहे. 'कोणतरी इथं बँकेच्या संदर्भात येतं आणि बोलतो. त्यांना अर्धवट माहिती असते. मी कधीही जाती-पातीचा विचार केला नाही.

पण काहींनी इथे ठराविक लोकांनाच कर्ज दिलं जातं असं भासवलं. पण तसलं आमच्या मनातही येत नाही. आम्ही सगळी कामं करतो. तुम्ही येता आणि भाषणं करता,' अशा शब्दात त्यांनी हाकेंच्या आरोपांवर भाष्य केलं. लक्ष्मण हाके हे ओबीसी आंदोलनाची लढाई लढत असले तरी ते सतत पवार कुटुंबियांवर गंभीर आरोप करत असतात.

त्यांच्या आरोपांना अनेकदा शरद पवारांच्या राष्ट्रवाचे आमदार रोहित पवार प्रत्युत्तर देत असतात. तर कधी अजितदादांचे आमदार अमोल मिटकरी हाकेंना अंगावर घेत असतात. अशातच आता थेट अजितदादांनी हाकेंचे आरोप खोडून काढल्याचं पाहायला मिळालं.

अजित पवार बारामतीबाबत नेहमीच भरघोस निधी देत असतात. तसं ते बोलूनही दाखवतात. आज पुन्हा एकदा अजितदादांनी कामाच्या बाबतीत आपला हात कुणीच धरू शकत नाही. मी कामाचा माणूस आहे, असं म्हणत बारामतीत केलेल्या कामांचा पाढा वाचला.

ते म्हणाले, 'बारामतीसाठी वेगवेगळ्या कामासाठी बारामतीत 25 कोटी मंजूर केले. बारामतीच्या शाळेसाठी काही पैसे उपलब्ध केले, गरिबांची पोरं शिकली पाहिजेत. उर्दू शाळेला साडेचार कोटी मंजूर केले. सकाळी 6 वाजता उठून काम करतो. कामाच्या बाबतीत आपला हात कुणीच धरू शकत नाही. मी कामाचा माणूस आहे.'

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT