IMD Warning : राज्यावर अतिवृष्टीचं संकट कायम! 3 दिवस 'या' भागात धो-धो पाऊस कोसळणार, आपत्कालीन कार्य केंद्राचा इशारा

Maharashtra Heavy Rain Alert : मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. अशातच राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सावधानतेचा इशारा दिला आहे.
Maharashtra Heavy Rain Alert
Flooded street in Maharashtra after heavy rain, highlighting the urgent need for disaster management and rainfall preparedness.Sarkarnama
Published on
Updated on

Pune News, 28 Sep : मागील काही दिवसांपासून राज्यातील विविध भागांमध्ये पावसाने थैमान घातलं आहे. पावसामुळे मराठवाड्यातील शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झालं आहे. अशातच राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सावधानतेचा इशारा दिला आहे. पुढील काही दिवस राज्यातील काही भागांमध्ये जोरदार पाऊस पडणार असल्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

त्यानुसार राज्य आपत्कालीन कार्य केंद्राने सर्व जिल्हा प्रशासनांना संभाव्य अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर सतर्कतेच्या सूचना जारी केल्या आहेत. घाट क्षेत्रात दरडी कोसळण्याची शक्यता असून, पूरस्थिती निर्माण होण्याचा धोका आहे. नद्यांच्या पाण्याच्या प्रवाहावर सतत निरीक्षण ठेवून आवश्यक उपाययोजना करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

जिल्हा प्रशासनाने 24x7 नियंत्रण कक्ष कार्यान्वित ठेवावेत. शहरी भागातील सखल ठिकाणी पाण्याचा निचरा करण्यासाठी पंप तैनात करावेत. कमी उंचीच्या क्षेत्रांचे सतत निरीक्षण करून योग्य ती खबरदारी घ्यावी. धोकादायक किंवा जुन्या इमारतींसाठी CSSR उपाययोजनांचे नियोजन करावे. वीज आणि रस्ते यांसारख्या पायाभूत सुविधांसाठी दुरुस्ती पथके, साखळी आरे आणि फीडर संरक्षण युनिट तयार ठेवावीत.

Maharashtra Heavy Rain Alert
Marathwada Flood Crisis : 'असा महापूर गुजरातमध्ये आला असता तर मोदी-शहा लष्कराचे विमान घेऊन आले असते; मराठवाड्याने भाजपला भरभरून मतदान केलं, पण संकटकाळी...'

कोकण आणि वरच्या खोऱ्यातील मध्यम धरणांमधील पाणीसाठा आणि विसर्ग यांचा नियमित आढावा घ्यावा. संभाव्य अतिवृष्टीची पूर्वसूचना SMS, सोशल मीडिया आणि स्थानिक प्रसारमाध्यमांद्वारे प्रसारित करावी. नागरिकांनी सतर्क राहावे, असे आवाहनही करण्यात आले आहे.

Maharashtra Heavy Rain Alert
Balasaheb Thorat : 'कलेक्टर नाचगाणी करतो, सरकार किती गंभीर'; शेतकऱ्यांचा संताप ओळखा, थोरातांचा सूचक सल्ला

भारतीय हवामान विभागाकडून 27 सप्टेंबर ते 30 सप्टेंबर 2025 या तीन दिवसांच्या दरम्यान राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाची तीव्रता वाढण्याचा इशारा देण्यात आलेला आहे. त्यानुसार कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात व्यापक पाऊस तर काही ठिकाणी अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.

मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसामुळे शहरी पुराच्या धोक्याची शक्यता असल्याचे नागरिकांनी सतर्क रहावे, असे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com