Pune News : गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेस मधील दोन महिला पदाधिकाऱ्यांमधील वाद विकोपाला गेला असल्याचा पाहायला मिळालं. राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रवक्त्या असलेल्या रूपाली पाटील ठोंबरे (Rupali Patil Thombare) यांनी प्रदेशाध्यक्ष आणि महिला आयोगाच्या अध्यक्षा असलेल्या रूपाली चाकणकर यांच्यावर गंभीर आरोप केले. यानंतर रूपाली ठोंबरे यांना पक्षाने कारणे दाखवा नोटीस देखील पाठवली आहे.
या सगळ्या वादाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असलेले अजित पवार पुणे दौऱ्यावर होते. या पुणे दौऱ्यादरम्यान त्यांनी पुणे जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीसंदर्भात आढावा बैठक घेतली. अजित पवार यांनी चाकणकर आणि रूपाली पाटील ठोंबरे यांच्यात सुरू असलेल्या वादावरही चर्चा केली. मात्र, या चर्चेनंतर या दोन्ही महिला नेत्यांमधील वाद दादांनी मिटवला की आणखी वाढवला असा प्रश्न निर्माण झाला आहे?. कारण अजितदादांसोबत झालेल्या चर्चेनंतर या दोन्ही नेत्यांनी एकमेकींना निर्वाणीचा इशारा दिला आहे.
अजित पवार (Ajit Pawar) यांनी सकाळपासूनच पुण्यामध्ये बैठकींचा धडाका लावला. या दरम्यान काही पक्षप्रवेशही झाले. यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी रूपाली पाटील ठोंबरे यांच्याशी सध्याच्या वादाच्या पार्श्वभूमीवर चर्चा केली. या चर्चेचा वृत्तांत देताना रूपाली पाटील ठोंबरे म्हणाल्या, मला जी काही पक्षाकडून नोटीस आली आहे. त्याचं मी उत्तर देणार आहे.
या भेटीदरम्यान मी अजित पवारांना सांगितलं की, ज्या महिला आयोगाने महिलांची सुरक्षितता, सक्षमता आणि त्यांचं मनोबल वाढवण्याचं काम करणं आवश्यक आहे. मात्र, सध्या आयोगाच्या अध्यक्ष या सोशल मीडिया पोस्ट तयार करून महिलांनाच अडकवण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच महिलांचं छळ आणि शोषण देखील करत आहेत. असंच अजित पवार यांच्या कानावरती मी घातला आहे.
तसेच याबाबतचे काही सोशल मीडिया पोस्ट, व्हिडिओज बाबतचे पुरावे मी दाखवले असून अजित पवार यांनी या प्रकरणात पोलिसांकडून अहवाल मागून घेणार असून जे चुकीचं असेल त्याच्यावर कारवाई करणार असल्याचे सांगितले आहे.
तसंच काही जण मी पक्ष सोडून जाणार असं म्हणत आहेत. परंतु मी पळून जाणार यातली नाही. पक्षांनी चाकणकरांबाबत जो काही मला खुलासा मागितलेला आहे. तो मी कायदेशीर रित्या देणार आहे. मात्र चाकणकरांचा महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा घ्यावा या मतावर मी ठाम असून ही मागणी अजित पवार यांच्याकडे केली असल्याचं रूपाली पाटील ठोंबरे यांनी ठामपणे सांगत हा वाद मिटला नसल्याचा स्पष्ट केलं.
तर अजित पवारांशी रूपाली ठोंबरे यांची भेट झाल्यानंतर पक्ष कार्यालयामध्ये रूपाली चाकणकर यांची इंट्री झाली चाकणकर यांनी देखील अजित पवार भेट घेतली आणि त्यानंतर बाहेर आलेल्या चाकणकरांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं की, माझ्यावर होणाऱ्या सगळ्या आरोपांची उत्तर मी सगळ्या प्रेस समोर देणार आहे.
दोन तीन दिवसांनी सगळ्यांना बोलावेन आणि सगळी उत्तर देईल असून माझा हातात कागद असल्याशिवाय मी काहीही बोलत नाही. माझ्या हातात कागद येणार असून ती कागदा आल्यानंतर मी पुराव्यासह पत्रकार परिषद घेऊन बोलणार असल्याच रूपाली चाकणकर यांनी सांगितलं.
एकीकडे रूपाली पाटील ठोंबरे यांनी आपण अजित पवारांसमोर सर्व पुरावे सादर केल्या असल्याचं सांगत आपण चाकणकरांचा राजीनामा घेण्याच्या मागणीवर कायम आहोत असंही म्हटलं. तर दुसरीकडे रूपाली चाकणकर यादेखील आपण पुराव्यांसह खुलासे करणार असल्याचं म्हणाल्या आहेत. त्यामुळे एकूणच आजच्या अजित दादा सोबत झालेल्या बैठकीत तरी या दोन्ही महिला पदाधिकाऱ्यांच्या वादावर तोडगा निघालाच नसल्याचं समोर आलं आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.