Ajit Pawar meets Baba Adhaav  Sarkarnama
पुणे

Ajit Pawar : बाबा आढावांशेजारी बसून अजितदादांनी 'ईव्हीएम'वर भूमिका मांडली, विरोधकांनाही सुनावलं

Ajit Pawar Baba Adhav EVM : अजित पवार म्हणाले, संविधान प्रमाणे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा हक्क आहे.⁠काही गोष्टी निवडून आयोगाशी संबंधित आहेत. निवडणूक आयोगा ही स्वायत्ता संस्था आहे.

Roshan More

Ajit Pawar News: विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर EVM वर संशय व्यक्त केला जातो आहे. बाबा आढाव पुण्यात आत्मक्लेश आंदोलन करत आहेत. शरद पवार यांनी आज आंदोलनस्थळी बाबा आढावांची भेट घेतली. शरद पवारांच्या नंतर अजित पवार हे देखील आंदोलस्थळी पोहोचले. बाबा आढावांच्या बाजुला बसून EVM वरील आक्षेप कसे चुकीचे आहेत, हेच अजित पवारांनी सांगितले.

अजित पवार म्हणाले, संविधान प्रमाणे प्रत्येकाला आपले मत मांडण्याचा हक्क आहे.⁠काही गोष्टी निवडून आयोगाशी संबंधित आहेत. निवडणूक आयोगा ही स्वायत्ता संस्था आहे. काही सर्वोच्च न्यायालयाशी संबंधित आहेत.त्यात आम्हाला ढवळाढवळ करता येत नाही.

लोकसभेचा कल वेगळा होता. आम्ही तो पराभव मान्य केला.त्यावेळी ईव्हीएमवर आक्षेप घेतला नाही. कारण तो जनतेचा कौल होता. ⁠माझा बारामती विधानसभा मतदारसंघात माझा उमेदवार 48 हजार मतांनी पराभूत झाला. त्याच मतदारसंघात मी एक लाखाहून अधिक मताधिक्क्याने निवडून आलो. बारामतीच्या लोकांनी ठरवलं होतं लोकसभेला ताई विधानसभेला दादा. आता पाच महिन्यात जनतेने कौल बदलला याला आम्ही काय करणार, असे देखील अजित पवार म्हणाले

नाना पटोले यांनी घेतलेल्या आक्षेपालाही अजित पवारांनी उत्तर दिले. ते म्हणाले, त्यांनी आरोप सिद्ध करून दाखवावे. संध्याकाळी असे पटोले यांचा आक्षेप होता. मात्र त्यात आमचा काय दोष आहे. लोकांनी कधी मतदान करावे. हे त्यांच्या हातात आहे. ⁠

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT