Bhai Jagtap on Election Commission : काँग्रेस आमदार भाई जगताप यांचं निवडणूक आयोगाबाबत वादग्रस्त वक्तव्य, म्हणाले...

Congress leader Bhai Jagtap : महाराष्ट्र निवडणूक निकालानंतर काँग्रेस निवडणूक आयोग आणि EVMवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत.
Bhai Jagpat
Bhai Jagpatsarkarnama
Published on
Updated on

Bhai Jagtap on Maharastra Election Result : महाराष्ट्र निवडणूक निकालानंतर काँग्रेस निवडणूक आयोग आणि EVMवर सातत्याने प्रश्न उपस्थित केले जात आहेत. शुक्रवारी तर काँग्रेसचे विधानपरिषदेचे आमदार भाई जगताप यांनी निवडणूक आयोगाबाबत आक्षेपार्ह आणि वादग्रस्त वक्तव्य केल्याचं समोर आलं आहे.

एका वृत्तसंस्थेशी बोलताना भाई जगताप(Bhai Jagtap) म्हणाले, निवडणूक आयोग तर कुत्रा आहे. जो पंतप्रधानांच्या बंगल्याबाहेर बसतो. लोकशाहीला मजबूत करण्यासाठी जेवढ्या एजन्सी बनवल्या गेल्या आहेत, दुर्दैवाने त्याचाच वापर करून आज संपूर्ण देशात कांड होत आहेत.

भाई जगताप यांच्या वक्तव्यावर भाजप(BJP) नेते किरीट सोमय्या यांनी म्हटले की, हा घटनात्मक संस्थेचा अपमान आहे. हे सहन केलं जाणार नाही. मी निवडणूक आयोग आणि मुंबई पोलिसात जगताप यांच्याविरोधात तक्रार दाखल केली आहे.

Bhai Jagpat
Sillod Assembly Election : निवडून आल्यानंतरही सत्तारांची साडेसाती संपेना; सिल्लोड न्यायालयात याचिका दाखल

तर दुसरीकडे भाई जगताप यांनी आपल्या वादग्रस्त टिप्पणीबाबत माफी मागण्यास नकार दर्शवला आहे. जगताप यांनी म्हटले की निवडणूक आयोगाच्या चमचेगिरीमुळे देशाची लोकशाही बदनाम झाली आहे. तर कुत्रा म्हटल्याबाबत ते म्हणाले, मी अजिबात माफी मागणार नाही आणि जर ते पंतप्रधान आणि अन्य मंत्र्यांच्या दबावात काम करत असतील तर मी जे काही म्हटलं तेच खरं आहे.

निवडणूक आयोग देशाच्या लोकशाहीला आणखी मजबू करण्यासाठी आहे. कुणाची सेवा करण्यासाठी नाही. मी माझ्या बोलण्यावर ठाम आहे. जगताप यांनी पुढे म्हटले की, काँग्रेसने EVM तंत्रज्ञान यासाठी आणलं होतं, कारण याचा वापर फ्रान्स आणि अमेरिकेत होत होता. परंतु 2009नंतर याच्या वापरवर संशय निर्माण होवू लागला.

Bhai Jagpat
Mahadev Jankar :...तर महादेव जानकर आपल्या एकमेव आमदारावर कारवाई करणार

महाराष्ट्र विधानसभा निवडणूक(Vidhansabha Election) निकालावर काँग्रेसने आक्षेप घेतला आहे. पक्षाकडून शुक्रवारी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या मतदान आणि मतमोजणी प्रक्रियेत गंभीर बेजबाबदारपणाचा आरोप केला आहे. पक्षाने निवडणूक आयोगास पत्र लिहिले आणि वैयक्तिक सुनावणीची मागणी केली.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com