ajit pawar (4).jpg sarkarnama
पुणे

Video Ajit Pawar : "मग लोकसभेला 'हा' वादा कुठे गेला होता?", अजितदादांनी घेतली कार्यकर्त्यांची फिरकी; नेमकं घडलं काय?

Ajit Pawar In Baramti : अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत 'एक कुटुंब एक झाड' संकल्पना राबविण्यात आली. यावेळी अजितदादांच्या हस्ते झाडांचे वाटप करण्यात आलं.

Akshay Sabale

उपमुख्यमंत्री अजितदादा पवार हे त्यांच्या रांगडी भाषणशैलीमुळे ओळखले जातात. कार्यकर्त्यांना खडसावणं असो किंवा मिश्किल टिप्पण्या अजितदादांची विधानं कायम चर्चेत असतात.

लोकसभेला बारामती मतदार संघात अजितदादांनी विधानांची चर्चा बरीच झाली. यातच अजितदादांनी बारामतीत कार्यकर्त्यांला उद्देशून केलेलं एक वक्तव्य चांगलंच चर्चेत आलं आहे.

अजितदादा ( Ajit Pawar ) हे आज बारामती तालुक्याच्या दौऱ्यावर आहेत. सकाळी शहरातील विविध विकास कामांची पाहणी केल्यानंतर अजितदादांच्या निवासस्थानी जनता दरबार घेतला. त्यानंतर अजितदादांच्या वाढदिवसानिमित्त बारामतीत 'एक कुटुंब एक झाड' संकल्पना राबविण्यात आली. यावेळी अजितदादांच्या हस्ते झाडांचे वाटप करण्यात आलं.

या कार्यक्रमात अजितदादा योजनांची माहिती देत होते. तेव्हा, कार्यकर्त्यांनी 'एकच वादा अजितदादा', अशा घोषणांनी कार्यक्रम दणाणून सोडला. यावर अजितदादा म्हणाले, "लक्षात आलं आहे. बसा जरा... हा वादा लोकसभेला कुठे गेला होता, कुणाला माहिती?" अशी फिरकी अजितदादांनी कार्यकर्त्यांची घेतली. अजितदादांच्या या विधानानंतर सगळीकडे एकच हशा पिकला.

"मी अंतरिम अर्थसंकल्पात काही योजना सुरू केल्या आहेत. पण, विरोधक हा चुनावी जुमला असल्याचं म्हणतात. प्रत्येकाला बोलण्याचा अधिकार आहे. राज्यातील काही राजकीय नेते आजकाल काहीही बोलत आहेत. त्यांची विधानं आपण आपण बघत असतो. राजकीय नेत्यांना ढेकणं वगैरे शब्द वापरले जातात. ही नावे बघून मला आश्चर्य वाटते. परंतु, मी ठरवलं आहे, आपण आपली महाराष्ट्राची राजकीय संस्कृती जपायला हवी. स्वर्गीय यशवंतराव चव्हाण यांनी आपल्याला जी शिकवण दिली आहे. त्याच विचारांवर आम्ही काम करतो," असं अजितदादांनी सांगितलं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT