Video Yashwant Mane : आमदार यशवंत माने आणि शिंदे गटाच्या नेत्यांमध्ये चंद्रकांतदादांसमोर जोरदार राडा; एकेरी उल्लेख अन्...

Solapur Dpdc Meeting : आमदार माने आणि शिंदे गटांच्या नेत्यांमध्ये जोरदार तू-तू मैं-मैं झाली. यावेळी चंद्रकांतदादा सुद्धा व्यथित झाले.
yashwant mane charan chavre.jpg
yashwant mane charan chavre.jpgsarkarnama
Published on
Updated on

एकीकडे अनगरच्या नवीन अपर तहसील कार्यालयावरून मोहोळचे राजकारण तापलं आहे. दुसरीकडे जिल्हा नियोजन समितीच्या ( डीपीसी ) बैठकीत याच विषयावरून जोरदार खडाजंगी झाली.

मोहोळचे अजितदादा पवार यांच्या राष्ट्रवादीतील आमदार यशवंत माने आणि शिंदेंच्या शिवसेनेचे नेते, डीपीसी सदस्य चरण चवरे आणि शिवसेना ( Shivsena ) जिल्हाप्रमुख मनीष काळजे यांच्यात हमरी-तुमरी झाली.

अपर तहसील कार्यालयाचा विषय काढत त्याची प्रक्रिया तात्काळ थांबविण्याची मागणी चरण चवरे यांनी केली. यास आमदार माने ( Yashwant Mane ) यांनी आक्षेप घेतला. चवरे यांनी आमदार माने यांचा एकेरी उल्लेख करत निषेध व्यक्त केला. त्यामुळे आमदार माने देखील संतप्त झाले. दोघेही एकमेकांकडे बोट करत बोलत असल्याचे पाहून व्यथित झालेले पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शांत राहण्याचं आवाहन केलं.

नेमकं घडलं काय?

मुख्यमंत्री सभागृहात बोलो किंवा बाहेर बोलो, त्यांचे वाक्य म्हणजे कायदा असतो, असं पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत सांगितलं. त्यांच्या वाक्याच्या धागा पकडून सदस्य चरण चवरे म्हणाले, "अनगर अपर तहसील कार्यालयाचा निर्णय रद्द करावा. या मागणीच्या निवेदनावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या निर्णयाला स्थगिती देत फेर सर्वेचा शेरा लिहिला आणि जिल्हाधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. तरीही या निर्णयाला अद्याप स्थगिती का मिळाली नाही?"

"जाणूनबुजून आम्हाला अनगरच्या दारात नेण्याचं काम केलं आहे. जर हे अपर तहसील कार्यालय रद्द झाले नाही, तर शंभर लोकांचे मृत्यू होतील. मी यशवंत मानेचा निषेध करतो. तू काय सांगतो? आमची गावे विकायला आला काय? तू खाली बस..." अशा एकेरी शब्दांत चरण चवरे यांनी आमदार माने यांच्यावर हल्लाबोल केला.

yashwant mane charan chavre.jpg
Rajan Patil : अजितदादांचे माजी आमदार राजन पाटलांचं थेट सुशीलकुमार शिंदेंना आवाहन; म्हणाले, दिलीप मानेंना...

यावेळी आमदार माने यांनी 'ये चरण, तुझा काय संबंध' असं म्हणताच मनिष काळजे आणि चरण चवरे यांनी आमदार माने यांचा जोर-जोरात घोषणाबाजी करत निषेध नोंदवला. तिकडून माने यांच्या बाजूनं सदस्य किसन जाधव यांनी चवरे यांना शिंगावर घेतलं. यामुळे सभागृहात प्रचंड गोंधळ उडाला. एकमेकांकडे बोट करून अरे-तुरेची भाषा वापरण्यात आली.

पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी शांत राहण्याचं आवाहन केलं. परंतु, त्यांचे कुणीही ऐकलं नाही. काही वेळ सभागृहातील सदस्य या गोंधळाकडे बघतच राहिले. आमदार विजयकुमार देशमुख यांनी चवरे आणि काळजे यांना शांत राहण्याचं आवाहन केलं. काही मिनिटांनी वादावर पडदा पडला.

yashwant mane charan chavre.jpg
Mohol Assembly Election : राजन पाटील विरोधकांची एकी विधानसभा निवडणुकीत चमत्कार घडवणार?

पालकमंत्री म्हणाले, मुंबईत या...

दोघांना शांत करत पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले, "हा विषय मुख्यमंत्र्यांचा आहे. तुम्ही मुंबईत या. जोपर्यंत स्थगितीचा प्रस्ताव तसेच त्यासंबंधित शासकीय आदेश जिल्हाधिकाऱ्यासमोर येत नाही, तोपर्यंत कार्यवाही करणार नाही. त्यामुळे आवश्यक प्रक्रिया मुख्यमंत्र्यांसमोर बसून पूर्ण करून घ्यावी."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com