राष्ट्रवादी पक्ष आणि घड्याळ चिन्ह मिळाल्यानंतर अजित पवार गटाच्या युवक कार्यकर्त्यांचा 'युवा मिशन 2024' हा मेळावा पुण्यात रविवारी ( 11 फेब्रुवारी ) पार पडला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांनी 12 ते 19 फेब्रुवारी या 'स्वराज्य सप्ताहा'निमित्त कार्यकर्त्यांना शपथ दिली आहे. तसेच, आम्ही वचनपूर्तीचं कार्य करणारे आहोत. निवडणुका डोळ्यासमोर ठेऊन काहीतरी बोलायचं आणि करायचं वेगळं ही आपली भूमिका नाही, असंही अजित पवारांनी सांगितलं.
अजित पवार म्हणाले, "12 ते 19 फेब्रुवारी हा स्वराज्य सप्ताह म्हणून साजरा करायचं पक्षानं ठरवलं आहे. आपण छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती मोठ्या दिमाखात साजरी करणार आहोत. साडेतीनशेव्या शिवराज्यभिषेक सोहळ्यानिमित्त राज्यभर विविध कार्यक्रम आणि उपक्रम राबवण्यात येत आहेत. शिवरायांनी त्यांच्या कार्यातून महाराष्ट्राला स्वाभिमान, आत्मभान, ओळख, अस्मिता, लढाऊबाणा आणि स्वराज्याची प्रेरणा दिली."
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
"राष्ट्रवादीनं कायमच छत्रपती शिवाजी महाराजांच्या 'रयतेचं राज्य' या संकल्पनेपासून प्रेरणा घेतलेली आहे. युवा वर्गाची ताकद आणि शक्ती ही आपल्या पक्षाची प्रेरणा आहे. युवा वर्ग हा पक्षाचा कडा आहे," असं अजित पवारांनी म्हटलं.
यावेळी 'स्वराज्य सप्ताहा'निमित्त अजित पवारांनी कार्यकर्ते, नेते आणि पदाधिकाऱ्यांना शपथ दिली आहे. अजित पवार म्हणाले, "येणाऱ्या 'स्वराज्य सप्ताहा'निमित्त जबाबदार नागरिक या नात्यानं शपथ घेतो की, मी सार्वजनिक जीवनात सर्व कायद्याचे पालन करेन. मी महिला आणि मातृशक्तीचा कायम आदर करेन. दरवर्षी मी एक झाड लावण्याचा आणि ते वाढवण्याचा संकल्प करीत आहे. मी माझ्या परिसरातील काळजी घेईन. मी स्वत: व्यसनापासून दूर राहिल. तसेच, व्यसनाच्या आहारी गेलेल्या व्यक्तीला परावृत्त करण्याचा प्रयत्न करेन."
"सार्वजनिक जीवनात धर्म, जात, पंथ, लिंग या आधारावर कुठल्याही प्रकाराचा भेदभाव करणार नाही. समाजात सार्वजनिक सद्भाव आणि सलोखा कायम राखण्याचा प्रयत्न करेन," अशी शपथ अजित पवारांनी दिली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.