Dhananjay munde : "नेतृत्वासाठी अजित पवार झिजले, अनेकांना विजयी टिळा लावला, पण...", धनंजय मुंडेंचा हल्लाबोल

Dhananjay munde in Pune : धनंजय मुंडेंनी रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर अप्रत्यक्षपणे टीका केली आहे.
sharad pawar ajit pawar dhananjay mune
sharad pawar ajit pawar dhananjay muneSarkarnama
Published on
Updated on

विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या आधारे अजित पवार गट हाच मूळ 'राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष' असल्याचा निकाल मंगळवारी ( 6 फेब्रुवारी ) केंद्रीय निवडणूक आयोगानं दिला. 'घड्याळ' हे चिन्हही अजित पवार गटाला ( Ajit Pawar ) बहाल करण्यात आले. या निर्णयानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या बालेकिल्ल्यात युवक मेळावा रविवारी ( 11 फेब्रुवारी ) पार पडत आहे. या मेळाव्यातून मंत्री धनंजय मुंडेंनी राष्ट्रवादी काँग्रेस-शरदचंद्र पवार गटावर हल्लाबोल केला आहे.

sharad pawar ajit pawar dhananjay mune
Lok Sabha Election 2024 : महायुतीचे वरिष्ठ नेते आज गोंदियात, उमेदवारीवर होईल का शिक्कामोर्तब ?

"२ जुलैच्या निर्णयानंतर ५ जुलैच्या सभेत खऱ्या अर्थानं लोकशाही व्यासपीठावर दिसली. आजही ती आपल्या समोर दिसत आहे. तेव्हापासून ६ फेब्रुवारीपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसचं भविष्य काय? याची चर्चा गावातील पारापासून बीकेसीतील सॉफ्टवेअरच्या कार्यालयात होत होती. पण, ६ फेब्रुवारीला निर्णय झाला आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, चिन्हही आपल्याला मिळालं. येथून पुढं फक्त अजित पर्व सुरू झाले," धनंजय मुंडे म्हणाले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"अजित पवार आयुष्यभर झिजत राहिले. पण, स्वत:साठी नाही, तर तत्कालीनं नेतृत्वासाठी. या झिजलेल्या चंदणाचे अनेकांना विजयी टिळा लावला आहे. ते विजयी झालेले आणि तिकडे राहिलेले कष्टीवादी अजित पवारांच्या विरोधात बोलणार असतील, तर त्यांना शिंगावर घेण्याची तयारी तरूणांना करावी लागणार आहे," असं धनंजय मुंडेंनी म्हटलं.

sharad pawar ajit pawar dhananjay mune
Sanjay Raut : "फेकूचंद मुख्यमंत्र्यांवर कोण विश्वास ठेवणार, ते...", राऊतांचं शिंदेंना प्रत्युत्तर

"तिकडे ( शरद पवार गट ) राहिलेल्या दोघांच्या बाबतीत बोलायचं आहे. एक गण्या आणि मन्या असतो. दोघेजण एका खोलीत बसलेले असतात. गण्या मन्याला म्हणतो, लाईट गेली वाटतं... मी मेणबत्ती लावतो. मन्या म्हणतोय मला उकडतंय पंखा लाव... तेव्हा गण्या बोलतो, मला वाटलंच होतो, असं काहीतरी बोलणार.... मन्या म्हणतो काय रे... गण्या बोलतो, अरे पंखा लावल्यावर मेणबत्ती विझेल ना... आता हे कोण गण्या आणि मन्या हे सांगण्याची गरज आहे का? एवढ्यावरून सगळ्यांनी समजून घ्यावं. इथून पुढं अजित पवार आणि इतर नेत्यांवर मर्यादा सोडून बोलल्यास राष्ट्रवादीचे तरूण शांत बसणार नाहीत," असा अप्रत्यक्षपणे इशारा धनंजय मुंडेंनी रोहित पवार आणि जितेंद्र आव्हाडांना दिला आहे.

sharad pawar ajit pawar dhananjay mune
Zeeshan Siddique Allegation : बाबा राष्ट्रवादीत जाताच मुलाचे काँग्रेसला फटकारे; झिशान सिद्दिकी नेमके काय म्हणाले ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com